अजितदादा पर्मनंट DCM : पाचव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
Dcm Ajit Pawar News : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या खदखदीचा परिणाम अखेर राज्याच्या राज्याच्या राजकारणात दिसून आला आहे. अखेर राष्ट्रवादीचा राजीनामा देत अजित पवार आपल्या 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासह अन्य 8 आमदारांनीही शपथ घेतली.
दरम्यान, अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पवार यांनी यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी 2 वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सरकार कोणत्याही पक्षाचे असो अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद फिक्स असल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra Politics : ज्यांना कंटाळून शिंदे गट फुटला; त्याच अजितदादांसाठी घातल्या पायघड्या!
आज सकाळपासून राज्याच्या घडामोडींना चांगलाच वेग आला होता. विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करुन मला संघटनेत काम करण्याची इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती. त्याआधीच शरद पवार यांनी राजकारणातून मुक्त होत राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत पक्षात भाकरी फिरवणार असल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी अजित पवारांनी मला संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट केलं होतं. यावर निर्णय होण्याआधीच प्रदेशाध्यपदासाठी अजित पवार इच्छूक असल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर आज सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह आमदारांची बैठक घेतली होती.
अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार –
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.