‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही’; कोल्हेंचा अजितदादांना सणसणीत टोला

Amol Kolhe On Ajit Pawar : ‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही, सोन्याचा चमचाही तोंडात घेऊन आलो नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. दरम्यान, अजित पवार गटात आज शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांनी प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान आयोजित […]

Amol Kolhe : अजितदादा आजकाल कुणाची स्क्रिप्ट वाचतात? अमोल कोल्हेंचा थेट सवाल

Amol Kolhe : अजितदादा आजकाल कुणाची स्क्रिप्ट वाचतात? अमोल कोल्हेंचा थेट सवाल

Amol Kolhe On Ajit Pawar : ‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही, सोन्याचा चमचाही तोंडात घेऊन आलो नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. दरम्यान, अजित पवार गटात आज शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांनी प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान आयोजित सभेतून अजितदादांनी अमोल कोल्हे यांचं सगळचं जुनं उकरुन काढत हल्लाबोल केला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत कोल्हेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

घराचे महाभारत कोणी केलं? विचारत सुनेत्रा पवारांच्या जाऊबाईंना रूपाली पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

अमोल कोल्हे म्हणाले, मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही, किंवा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही. मी डॉक्टर आणि कलाकार माझ्या स्वत:च्या हिमतीवर झालो आहे. माझा काका डॉक्टर होता म्हणून मला एमबीबीएस पदवी मिळालेली नाही. माझा राजकारणाचा पिंडा आहे की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण आहात.. माझं नाव कोणत्याही भ्रष्टाचारात नाही म्हणजे माझा राजकारणाचा पिंडा नाही का? सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने राजकारणात यायचं नाही का? राजकारणाच्या पिंडाचा शिक्का मारेणारे तुम्ही कोण आहात? या शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

होळीच्या दिवशीही ‘योद्धा’चा व्यवसाय मंदावला, दुसऱ्या सोमवारी खात्यात केली इतकी कमाई

मी 2016 साली चित्रपटातमध्ये नथुराम गोडसेंची भूमिका केली होती. अजित पवारांकडून शिळ्या कडीला उत आणला जातोय. अजित पवारांनी खाजगी विषयांवर बोलेले मग आम्हीही अजित पवार खाजगीत काय बोलले ते आम्ही सांगावं का? संसदरत्न पुरस्कारबाबत शिवाजी आढळराव पाटील यांना माहित नाही. मला शरद पवार यांचा उमेदवार म्हणून मायबाप जनतेने मतदान केले आहे, जर अजित पवारांनी उमेदवारी दिली तर मग आता त्यांना दिल्लीवारी का करावी लागतेय? असा खोचक सवालही कोल्हे यांनी यावेळी केला आहे.

Exit mobile version