Download App

मोठी बातमी! शरद पवार गटाला मिळालं नवं नावं; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘शरदचंद्र पवार’

पुणे : राष्ट्रवादी पक्ष चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharadchandra Pawar) हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता यापुढील काळात शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘शरदचंद्र पवार’ असं संबोधण्यात येणार आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्हे सुचवण्यासाठी आजचा वेळ दिला होती. त्यानूसार शरद पवार गटाने आज आपल्या गटाची तीन नावे आणि चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. यामध्ये नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, दुसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार अशी तीन नावे शरद पवार गटाकडून देण्यात आली. तर वटवृक्ष चिन्ह देण्यात यावं, अशी आग्रही मागणी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सुत्रांकडून देण्यात आली होती.

संजय राऊत सुट्टी देईनात! CM शिंदेंच्या उपस्थितीत गुंडांचा शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो ट्वीट

विशेष म्हणजे शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या तिनही नावांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. एका नावात नूसतं शरद पवार तर दुसऱ्या नावांमध्ये शरदचंद्र पवार आणि तिसऱ्या नावामध्ये शरदराव पवार अशा नावाचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, पक्षाच्या नावाच्या सुरुवातीला नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नोंदणीकृत नाव आहे तसंच ठेवण्यात आलं.

निवडणूक आयोगाकडून काल राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला तर दुसरं म्हणजे पक्षाचं चिन्ह घड्याळ हे देखील अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं आहे. यावेळी निर्णय देताना निवडणूक आयोगाने बहुमताचा विचार करुनच निर्णय दिला असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे शरद पवार गटाने तीन नावे आणि चिन्ह देण्यात यावं, असे निर्देश आयोगाकडून काल देण्यात आले होते.

सध्या राज्यसभा खासदारांचा कार्यकाल संपला असून निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही जोरदार हालचाली सुरु आहेत. पक्ष आणि चिन्ह गेल्याने शरद पवार गटाने आपली तीन नावे आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे मागणी केली. त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून यावर निर्णय घेतला आहे. कारण उद्यापासून राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार असल्याने निवडणूक लवकरच निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

follow us