NCP Sharad Pawar party State president Shashikant Shinde Criticize to Governmnet on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषण करत आहे यावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ते गप्प का आहेत अशी विचारणा ही सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे यावरती बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले आरक्षणाबाबत शरद पवारांनी काही आश्वासन दिली नाहीत त्यामुळे ही काम सत्ताधारी सत्ताधाऱ्यांची आहे.
मुंबईत जरांगेंचं उपोषण; शिंदे मात्र दरेगावच्या वाटेवर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण
नवी मुंबई येथील आंदोलनाच्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिली होती सत्ता मिळवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे असो किंवा आत्ताचे मुख्यमंत्री असो यांनी आरक्षण आम्ही तात्काळ देऊ अशी आश्वासने दिली होती आरक्षण देणे हे तुमच्या हातात आहे तुम्हाला कोणी अडवलेले नाही विधिमंडळातील सर्व आमदारांनी देखील या साठी पाठिंबा दिलेला आहे तसेच केंद्रामध्ये देखील तुमचे बहुमत आहे आरक्षणाचा कोठा वाढवून देता येतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे असे यावेळी बोलताना शिंदे म्हणाले. तसेच यावेळी बोलताना शिंदे म्हणाले तुम्ही दिलेली आश्वासनाची पूर्तता हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे राजकारणामध्ये बोलायचं तर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी तुम्ही तुमचं बघा ना आमच्याकडे ज्यावेळेस जबाबदारी असेल त्यावेळेस आम्ही आमचं बघू असे शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला.
देवदर्शनासाठी पायी निघालेल्यांना कंटेनरने चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे तसेच आरक्षण देण्याबाबत कोणतीही दुमत नाही पूर्वीसारखा मराठा राहिलेला नाही आता यामध्ये विभाजन होऊन काही अल्पभूधारक देखील झालेले आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावं याबाबत कसा निर्णय घ्यायचा यासाठी तुम्ही विरोधी पक्षांना बोलवले का तुम्ही समिती नेमली आहे तुम्ही चर्चा करताय ज्यावेळेस आम्हाला बोलावलं जाईल त्यावेळेस आम्ही देखील चर्चा करू
Video : त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा; फडणवीसांनंतर जरांगेंच्या टार्गेटवर आयुक्त
आरक्षण देताना ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देता येईल का हा निर्णय चर्चेद्वारे त्या समिती समितीने तरंगे पाटलांच्या शिष्टमंडळाला बोलवून चर्चा करणे गरजेचे आहे आम्हाला बोललो तर आम्ही देखील सोबत चर्चा करू असे यावे शिंदे म्हणाले. कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये आंदोलन दडपण्याचा मोडण्याचा प्रयत्न होऊ नये चर्चा करून यामधून मार्ग निघू शकतो असे शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबिर
14 व 15 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबिर हे नाशिक येथे पार पडणार आहे अवकाळी अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामध्ये शेतकऱ्यांचा हमी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असो किंवा कांदा प्रश्न असो यावरती शिबिरादरम्यान चर्चा करणार आहोत तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे सरकार द्यायला तयार नाही आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्ये शेतकऱ्यांचा प्रक्षेप आम्ही करणार आहोत संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत.
सरकार कर्जबाजारी…अजित पवारांना टोमणा
कर्जमाफी वरून वेळोवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले असता योग्य वेळी कर्जमाफी करू असं आश्वासन पवार यांच्याकडून देण्यात आले यावरती बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले वेळ ही काही निवडणुकीच्या वेळीच येते का इथे सरकारच कर्जबाजारी आहे सरकारलाच आता कर्ज देण्याची वेळ आलेली आहे. ती वेळ कधी येईल हे माहीत नाही मात्र आम्ही सत्ताधाऱ्यांना ती वेळ आणण्यास भाग पाडू असं यावेळी बोलताना शिंदे यांनी अजित पवारांना टोमणा मारला.