देवदर्शनासाठी पायी निघालेल्यांना कंटेनरने चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Container crushes people walking for Devdarshan; Four die on the spot, two seriously injured in Beed : आज 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये देवदर्शनासाठी पायी चाललेल्या 6 जणांना एका कंटेनरने चिरडलं. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना बीड जिल्ह्यातील नामलगाव येथे घडली आहे.
Video : मुंबईकरांना त्रास देऊ नका, BCM, CSMT चा रस्ता…; जरांगेंनी प्रेस घेत दिले मोठे आदेश
देवदर्शनासाठी पायी निघालेल्यांना कंटेनरने चिरडलं…
आज 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास बीड जिल्ह्यातील बीड-धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या नामलगाव येथे 6 जण देवदर्शनासाठी पायी चालले होते. हे लोक पेंडी येथे दर्शनासाठी चालले होते. या लोकांना एका भरधाव कंटेनरने चिरडल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत. या जखमींना रूग्णालयात उपचारांसाठा दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू झाला आहे.
जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारनं वेधलं लक्ष; मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!
काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी भीषण अपघात…
गेल्या काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी असाच भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये बीडवरून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. बसमध्ये पाणी शिरल्यामुळे बस देखील बंद पडली. अचानक पाणी बसमध्ये शिरू लागल्याने प्रवाशांच्या चिंतेत काही वेळासाठी भर पडली होती. मात्र बार्शी शहर पोलीस आणि अग्निशमन दलाने तत्परता दाखवत या सर्व 27 प्रवाशांना बाहेर काढलं. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास घेतला. दरम्यान, बस मध्येच बंद पडल्यामुळे काही वेळ तुळजापूर – बार्शी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.