Download App

शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही ठराविक नेते सोडले तर कोणता आमदार आणि नेता कोणत्या गटात आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. राष्ट्रवादीत (NCP) फूट पडलेली नाही असा दावा दोन्ही गटांकडून केली जात असताना निवडणूक आयोगाने (Election Commission) मात्र पक्षात फूट पडल्याचे मान्य केले आहे. यानंतर आता 6 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या घडामोडींवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे. जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादीत कसलीह फूट पडली नाही असं शरद पवारांनी (Sharad Pawar) निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, तरीही निवडणूक आयोगाने पक्षफुटी संदर्भात सुनावणीची तारीख दिली, असा आरोप पाटील यांनी केला.

Women’s Reservation Bill : 27 वर्ष, 3 पंतप्रधान, 12 प्रयत्न; आता मोदी सरकारला तरी यश येणार का?

राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही. मला कुणीही विरोध केला नाही. कुणीही माझ्या धोरणांना जाहीरपणे विरोध केलेला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे असे सगळेच मुद्दे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले होते. आयोगाला जे पत्र दिले आहे त्याअनुषंगाने भेटण्यासाठी वेळही मागितला होता मात्र आयोगाने काही वेळ दिला नाही. पक्षात वाद आहे हे अचानक ठरवलं आणि सुनावणीसाठीही बोलावलं. खरं तर आयोगाने शरद पवारांची बाजू मांडण्यासाठी एक संधी देणं गरजेचं होतं असे पाटील (Jayant Patil) म्हणाले.

मैदानातही दोन्ही गट आमनेसामने

राष्ट्रवादीतील फुटीनंतर (NCP Crisis) आता पक्षाचे नाव आणि चिन्हावरही अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून दावा सांगितला जात आहे. निवडणूक आयोगाच्या पुढील सुनावणीत काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या तरी दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाप्रमाणेच मैदानातही दोन्ही गटांची लढाई सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू होण्याआधीच दोन्ही गटाच्या सभांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.  ऐन निवडणुकांच्या तोंडावर या घडामोडी घडत असताना राज्यात वेगळेच राजकीय चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Women’s Reservation Bill : मोदींच्या मास्टरस्ट्रोकने बदलणार लोकसभेच्या 160+ जागांवरील गणित

Tags

follow us