Download App

Breaking News: एनडीएचे खातेवाटप; अमित शाहांकडे गृह, नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक

जम्बो मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज सोमवारी जाहीर झाले आहे. महत्त्वाचे पाच खातेही पुन्हा महत्त्वाच्या व्यक्तींकडे ठेवले आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

NDA Cabinet portfolio allocation : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली काल तिसऱ्यांदा एनडीए (NDA) सरकार अस्तित्वात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेटमंत्री, 36 राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले पाच राज्यमंत्री आहेत. यंदाचे हे 71 जणांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे. काल शपथविधी झाल्यानंतर आज खातेवाटप जाहीर झाले आहे. अमित शाह (Amit Shah), राजनाथ सिंह, एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, नितीन गडकरी यांच्याकडे जुनेच खाते ठेवण्यात आले आहेत.तर पियूष गोयल यांच्याकडे पुन्हा वाणिज्यमंत्रीपद देण्यात आलंय. तर अर्थखात्याची जबाबदारी पुन्हा एकदा निर्मला सितारामन यांच्याकडे आहे.


शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मोठी जबाबदारी

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे केंद्रात आले आहेत. त्यांना कृषी आणि ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज असे महत्त्वाचे खाते मिळाली आहे. हे महत्त्वाचे खाते आहे. भाजपला ग्रामीण भागात फटका बसला आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

मोहोळांकडे मोठी जबाबदारी
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे राज्य मंत्री झाले आहेत. त्यांना सहकार आणि नागरी उड्डाण असे दोन खाते मिळाली आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार खातेही आहे. या खात्याचे राज्यमंत्री मोहोळ असणार आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी बँका, कारखाने असल्याने हे महत्त्वाचे खाते आहे.


कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे? पाहा संपूर्ण यादी
अमित शाह- गृहमंत्रालय
राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जितन राम मांझी- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
के राममोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्ती
किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री
चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री
मनोहर लाल खट्टर- उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
राजीव राजन सिंह – पंचायत राज मंत्रालय
विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्रालय
ज्युएल ओराम- आदिवासी विकास मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय
गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
किशन रेड्डी – कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार
राव इंद्रजित सिंह- नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय
अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रतापराव जाधव – आयुष मंत्रालय
जयंत चौधरी – कौशल्य विकास

राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
रवनीत बिट्टू- अल्पसंख्यांक राज्यमंत्री
जितीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
कृष्णन चौधरी- सहकार मंत्रालय
रामदास आठवले – सामाजिक न्याय मंत्रालय
नित्यानंद राय- गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
व्ही सोमन्ना – जलशक्ती, रेल्वे मंत्रालय
चंद्रशेखर प्रेमासनी- ग्रामीण विकास मंत्रालय
एस पी बघेर – दुग्ध विकास मंत्रालय
क्रितीवर्धन सिंह – पर्यावरण
बी एल वर्मा – सामाजिक न्याय
सुरेश गोपी – पेट्रोलियम, पर्यंटन
एल मुरुगन- माहिती आणि प्रसारण
अजय तम्ता – रस्ते वाहतूक
बंदी संजय कुमार – गृहमंत्री
कमलेश पासवान – कोळसा मंत्रालय
सतीश चंद्र दुबे – खणन मंत्रालय
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रणवीर सिंह – अन्न प्रक्रिया
दुर्गादास उइके- आदिवासी विकास मंत्रालय
रक्षा खडसे – युवक कल्याण मंत्रालय
सुकांता मुजुमदार – शिक्षण
सावित्री ठाकुर – महिला आणि बालकल्याण
तोखन साहू – शहर विकास मंत्रालय
भूषण चौधरी – जलशक्ती
भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग मंत्रालय
हर्ष मल्होत्रा – कॉर्पोरेट अफेअर्स
निमुबेन जयंतीभाई बाम्भनिया – ग्राहक निवारण आणि अन्न वितरण
मुरलीधर मोहोळ – सहकार , नागरी उड्डाण मंत्रालय
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक
पवित्रा मार्गारेट – परराष्ट्र

———————–

follow us

वेब स्टोरीज