Download App

लाडकी बहीण योजनेकडे व्यापारी पद्धतीने पाहू नका; नीलम गोऱ्हेंचे विरोधकांवर टीकास्त्र

महिलांना केवळ 1500 रुपये दिले जातात, अशी टीका करून विरोधकांनी या योजनेकडे व्यापारी पद्धतीने बघू नये, भाऊबिजेची किंमत करायची नसते.

  • Written By: Last Updated:

Neelam Gorhe : महायुती सरकारने (Mahayuti) आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या चर्चेत आहे. ही योजना राज्यात अल्पावधीत लोकप्रिय ठरताना पाहायला मिळत आहे. याच योजनेवरून विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

फडणवीसांच्या ‘सो कॉल्ड’ तत्वांना मलिकांनी दाखवली केराची टोपली; अंबादास दानवेंचा हल्लाबोल 

महिलांना केवळ 1500 रुपये दिले जातात, अशी टीका करून विरोधकांनी या योजनेकडे व्यापारी पद्धतीने बघू नये, भाऊबिजेची किंमत करायची नसते, अशी टीका गोऱ्हे यांनी केली.

लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचा उद्या पुण्यात शुभारंभ होणार आहे. याविषयी बोलतांना गोऱ्हे म्हणाल्या, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील महिला उपस्थित राहणार आहेत. तर इतर जिल्ह्यातील महिला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेच्या सुदर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार, किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप देशमुख, भाजपचे संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

अंधारे – धंगेकरांकडून गंभीर आरोप करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला ‘बक्षिशी’, विशेष पुरस्कार जाहीर 

पुढं गोऱ्हे म्हणाल्या, ही योजना राबवली जात असताना विरोधक त्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुती सरकारन केवळ लाडकी बहिण योजना सुरू केलेली नाही. तर महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तीन सिलिंडर मोफत, महिलांना रोजगार देण्यासाठी इ रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य, बचत गटातील महिलांना भांडवल देणे, विद्यार्थ्यीनींचे उच्च शिक्षण मोफत करणे अशा योजना राबवल्या जात आहेत. विरोधक यापूर्वीही सत्तेत होते, त्यांना अशा योजना राबविण्याची संधी होती, पण त्यांनी निर्णय घेतले नाहीत, याची त्यांना रुखरूख असेल, असा टोला त्यांनी लगावला.

follow us