Neelam Gorhe : आगामी लोकसभा निवडणूकपूर्वी सीमाभागाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येतांना दिसतोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी एक वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी बेळगावात येऊ नये, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याचं कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी समर्थन केलं. दरम्यान, याप्रकरणी आता विधानपरिषेदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नांदेडमध्ये कर्नाटकचे मतदार असतील, त्यामुळं चव्हाणांनी सिद्धरामय्यांच्या वक्तव्याचं समर्थनं केलं असेल, असा उपरोधिक टोला गोऱ्हे यांनी लगावला.
पुन्हा दिसला हृतिक रोशनचा जलवा; ‘फाइटर’च्या अॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड!
आज माध्यमांशी बोलतांना नीलम गोऱ्हे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी सिध्दरायमय्या यांच्या वक्तव्याच्या समर्थन केलं. त्याविषयी विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या की, नांदेडमध्ये काही मतदार कर्नाटकचे आहेत का पाहावं लागेल. कदाचित कर्नाटकचे मतदार नांदेडमध्ये असतील त्यामुळं चव्हाणांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं समर्थन केलं असेल, असा टोला त्यांनी लगावला. मात्र, सिमवाद आणि भाषा यावर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राजकीय मतभेद असू नये, असं कर्नाटक हा काही दुसरा देश नाही. सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याती उच्च स्तरीय समिती आहे. त्यात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. सीमावादावर ही समिती योग्य निर्णय घेईल, असं गोऱ्हे म्हणाल्या.
Ravina Tandon: वयाबद्दल विचारताचं अभिनेत्री भडकली, म्हणाली, ‘उर्मिला, माधुरी अन् मला…”
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या ८६५ गावांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याची घोषणा केली. मात्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना आमच्या हद्दीत येऊ नये, असं बजावत महाराष्ट्राने कर्नाटकात हस्तक्षेप करू नये, असे सिद्धरामय्या म्हणाले. सिद्धरामय्या यांच्या भूमिकेचं अशोक चव्हाण यांनी समर्थन केलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं विधान चुकीचं नाही. राज्य सरकारने आधी राज्यात लक्ष दिलं पाहिजे. कर्नाटकात जाण्यापेक्षा राज्यात अनेक ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळं राज्यात लक्ष द्या, असं चव्हाण म्हणाले होते.
दरम्यान, चव्हाण यांच्या भूमिकेवरून नीलम गोऱ्हे यांनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळं गोऱ्हे यांनी केलेल्या टीकेला आता अशोक चव्हाण काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.