तारीख ठरली! निवडणुका तोंडावर… मंत्री देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेचा अहिल्यानगरमध्ये मेळावा

Shiv Sena Shinde Group Melava in Ahilyanagar On 7 June : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान येत्या 7 जून रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे (Shiv Sena) गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित राहणार आहे. दरम्यान येणाऱ्या निवडुणकाची रणनीती कशी असणार आहे याबाबत मंत्री देसाईंकडून कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे या मेळाव्याला मोठे राजकीय महत्व (Eknath Shinde) प्राप्त झाले आहे.
विधानसभा निवडणुकानंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुका या महायुतीने एकत्र लढवल्या व चांगले यश देखील त्यांना मिळाले. याच धर्तीवर आगामी निवडणुका (Shinde Group Melava in Ahilyanagar) या महायुती म्हणून लढणार कि स्वबळावर लढण्यात येणार यावर वरिष्ठांकडून निर्णय घेण्यात येणार आहे, मात्र आता निवडणूक पाहता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी जोरदार सुरु आहे.
येत्या 7 जून रोजी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये (Shinde Group Melava) शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. याअनुषंगाने आज शहरात शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. पक्षबांधणीसाठी तसेच येणाऱ्या काळात असलेल्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री देसाई येणार आहे.
रहस्य, विनोद अन् ट्विस्ट! ‘गाडी नंबर 1760’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
या मेळाव्यात येणाऱ्या निवडणुकांची रणनीती कशी असणार, यावर चर्चा केली जाणार आहे. आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. मात्र येणाऱ्या काळात काही अन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्यानुसार स्वबळावर निवडणूक लढवण्याची देखील आमची तयारी असणार आहे, असं यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.
RCB Victory : हातापाया पडून रजा, आनंदात स्टेडियमकडे धाव अन् विराटच्या चाहतीचा करूण अंत
मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा
अहिल्यानगर महानगर पालिकेत आजवर अनेकदा शिवसेनेचा भगवा हा फडकला आहे. मध्यंतरीच्या काळात राजकीय पक्षांमध्ये फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले आहे. यातच नगरमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा उबाठा गट आहे. मात्र विधानसभेतील निकालानंतर महायुतीला असलेले पोषक वातावरण पाहता शिंदेंच्या नेतृत्वखाली नगरच्या पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला जाईल, असा विश्वास यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी बोलवून दाखवला.