Old pension Scheme : स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय, ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंचा टोला

मुंबई : सध्या राज्यभरात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुन्या पेन्शन योजनेवरून टीका-टीपण्णी देखील सुरू आहे. यामध्ये नुकतचं माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाच्या नेते उद्धव ठाकरे यांनी देखील यावर ‘मी जर आता मुख्यमंत्री असतो तर जुनी […]

Nilesh Rane Udhav Thakre

Nilesh Rane Udhav Thakre

मुंबई : सध्या राज्यभरात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुन्या पेन्शन योजनेवरून टीका-टीपण्णी देखील सुरू आहे. यामध्ये नुकतचं माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाच्या नेते उद्धव ठाकरे यांनी देखील यावर ‘मी जर आता मुख्यमंत्री असतो तर जुनी पेन्शन योजना लागू केली असती’ असं वक्तव्य केलं आहे.

त्यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वटरवर टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मी जर आता मुख्यमंत्री असतो तर जुनी पेन्शन योजना लागू केली असती’ या वक्तव्यावर निलेश राणे म्हणाले की, ‘हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय.’ असा टोला त्यांनी यातून उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान राज्यात जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. विरोधी पक्षाने आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. राज्यातील जुन्या पेन्शनसाठी चालू आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

satyajeet tambe ; जुनी पेन्शन लागू करणं शक्य, अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल

ही समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे. ही समिती राष्ट्रीय निवृत्ती योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आणि जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम यांचा तुलनात्मक अभ्यास करून शिफारस अहवाल शासनास तीन महिन्यात देतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात सांगितलं. पण अजूनही जुन्या पेन्शनसाठी राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनाचा बेमुदत संप आजही सुरु आहे.

Exit mobile version