ठाकरेंचं राम मंदिर अन् 1993 च्या दंगलीतलं योगदान काय? नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

Nitesh Rane On Uddhav Thackeray : राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir)सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केली आहे. राम मंदिराला उद्धव ठाकरेंचं काहीही योगदान नाही. आणि […]

Nitesh Rane : 'ठाकरे गटात राऊत विरुद्ध आदित्य गँगवॉर, दोघांची नार्को करा'; नितेश राणेंचा पलटवार

Nitesh Rane : 'ठाकरे गटात राऊत विरुद्ध आदित्य गँगवॉर, दोघांची नार्को करा'; नितेश राणेंचा पलटवार

Nitesh Rane On Uddhav Thackeray : राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir)सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केली आहे. राम मंदिराला उद्धव ठाकरेंचं काहीही योगदान नाही. आणि कोणी उद्धव ठाकरेंचं 1993 च्या दंगलीत काही योगदान असल्याचं सांगत असतील तर त्यांनी त्या दंगलीतला उद्धव ठाकरेंचा एक पुरावा, एक फोटो आणून द्यावा असं ओपन चॅलेंज यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

अजित पवारांच्या गटाविरोधात भाजप-शिवसेना एकवटले; 800 कोटींच्या निधीवरुन घेतला पंगा

नितेश राणे म्हणाले की, ज्याच्यावर एक साधा एफआयआर नाही, एक एनसी नाही, त्या उद्धव ठाकरेला का बोलवायचं? त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराच्या कार्यक्रमाला का बोलवायचं? हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान, विश्व हिंदू परिषदेचं योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवकांचं योगदानाबद्दल कोणाचही दुमत नाही. पण विषय असा आहे की, ज्या उद्धव ठाकरेंचा राम मंदिर आणि अयोध्येशी काडीमात्र संबंध नाही, त्याला मंदिराच्या कार्यक्रमाला का बोलवायचं? असाही सवाल केला.

Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला

ज्यांनी मुख्यमंत्री असताना राम मंदिरासाठी ऑनलाईन देणगी जमा होत होती, त्यावेळी याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केला होता. म्हणून संजय राऊतला सांगेल की, राम मंदिर आणि तुझा मालक उद्धव ठाकरेचा काहीही संबंध नसल्याने आणि राम मंदिराच्या कार्यक्रमाला स्वतंत्र फोटोग्राफर्स नेमले आहेत. त्यामुळे मुंबईमधून फोटोग्राफर कशाला मागवायचा असाही खोचक सवाल यावेळी नितेश राणे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांना मिळालेलं निमंत्रण ते योग्यच आहे. कारण त्यांचं त्या ठिकाणी योगदान आहे. 1993 च्या दंगलीच्या वेळी उद्धव ठाकरे बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरुममध्ये लपायचा. त्याचा काय संबंध 1993 च्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी, असाही सवाल यावेळी उपस्थित केला. तुम्ही कितीही फडफड केली तरी तुमच्यासारख्या चपट्या पायाच्या लोकांना त्या शुभ दिवशी बोलवायचं नाही, अशी टीका केली.

Exit mobile version