Download App

राणेंनी सलिम कुत्तासोबत व्हिडिओ दाखवला, पण अंधारेंनी पिक्चरच दाखवला

Sushma Andhare Vs Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे गॅंगस्टर सलिम कुत्तासोबत फोटो दाखवले आहे. नितेश राणेंनी भर हिवाळी अधिवेशनात हे फोटो दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोच्या मुद्द्यावरुन आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचं सुरु झालं आहे. नितेश राणे यांनी फक्त फोटो दाखवल्याचं म्हणत मी पिक्चरच दाखवायला तयार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि सलिम कुत्ता यांच्यासोबतच व्हिडिओच माध्यमांसमोर दाखवला आहे.

तळवडे दुर्घटनेत कारवाईचा फास आवळला; रेड झोनबाबतही बैठक घेणार : फडणवीसांची ग्वाही

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, सलिम कुत्ताच्या पार्टीत गिरीश महाजनही होते, कारण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वींचे फोटो दाखवले आहेत पण आख्खा पिक्चर मी दाखवायला तयार आहे. नितेश राणेनी जे फोटो झळकावले त्यात आमचे पदाधिकारी दोषी असतील तर नक्की कारवाई व्हावी
पण या व्हिडिओमध्ये सालिम कुत्तासोबत गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, बाळासाहेब सानप हे एकाच फ्रेममध्ये दिसत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Maratha Reservation चा प्रस्ताव सुरु अन नेतेमंडळी जेवणात व्यस्त… तनपुरे संतापले

तसेच सालिम कुत्ता यांच्या भाजपचे मंत्री असून यांच्यासोबत देवयानी फरांदेही दिसत आहेत. हा व्हिडिओ मी माध्यमांनाही देईल. दोन वर्षांपूर्वी महाजनांचं नाव या रिपोर्टमधून वगळंल गेलं असल्याचंही बातमीत दिसत असल्याचं सुषमा अंधारे म्हटल्या आहेत. तसेच ही बातमी सर्व चॅनेलला आहे? याचा अर्थ काय? असा सवालही अंधारेंनी यावेळी केला आहे.

Bhaskar Jadhav : राणे, शिंदेंची मिमिक्री अन् रामदास कदमांना बामलाव्या का म्हणतात? भास्कर जाधवांनी सांगून टाकलं

दरम्यान, मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलीम कुत्ता हा गँगस्टर सध्या चर्चेत आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एक पार्टीतला व्हिडिओ नितेश राणेंनी दाखवला आहे. यामध्ये बडगुजर हे सलीम कुत्ता सोबत डान्स करताना दिसत आहेत.

या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. या प्रकरणात इतरही अनेक नेत्यांची नावे समोर येणार असल्याची शक्यता आहे.

Tags

follow us