‘मास्टरमाइंड’ ललितचा मोठा खुलासा; संसदेत घुसण्यासाठी बनवले होते A अन् B प्लॅन
Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत घुसखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता तपास यंत्रणा याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असून, अटकेत असलेल्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. या सर्व घटनेमागे मास्टरमाइंड असणाऱ्या ललित झा (Lalit Zha) याने चौकशीदरम्यान संसदेत घुसण्यासाठी दोन प्लॅन बनवण्यात आल्याचा मोठा खुलासा केला आहे. 13 डिसेंबरसाठी दोन योजना तयार करण्यात आल्या होत्या. यातील प्लॅन A आणि प्लॅन B असे नियोजन करण्यात आले होते. या दोन्ही योजनांमध्ये कोणत्याही प्रकारे संसदेच्या (Parliament Security) आत घुसणे हाच होता. तसेच यातील एक नियोजन फसले तर, दुसऱ्या प्लॅनवर काम करण्याची योजन आखण्यात आली होती, असा खुलासा ललित झा याने पोलीस चौकशीत केला आहे.
दाऊदसारखाच अमोल शिंदेही ‘दहशतवादी’ ठरणार! धडकी भरवणारा UAPA कायदा काय आहे?
काय होता प्लॅन A आणि B
पोलीस चौकशीदरम्यान ललितने अनेक खुलासे केले आहेत. यात त्याने प्लन A आणि प्लान B काय होता. त्याची आखणी कशी करण्यात आली होती याचाही खुलासा केला आहे. प्लॅन A नुसार सागर शर्मा आणि मनोरंजन डी त्यांच्याकडे पास असल्याकारणाने संसदेत जातील असे निश्चित करण्यात आले. तर, संसदेच्या बाहेर महेश आणि कैलाश हे दोघे संसदेच्या बाहेर पोहचून स्मोक बॉम्ह जाळत घोषणाबाजी करतील असे ठरण्यात आले. मात्र, योजनेनुसार, महेश आणि कैलाश गुरुग्राममधील विशाल उर्फ विक्कीच्या घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे तेव्हा अमोल आणि नीलम यांना हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची जबाबदारी सोपण्यात आली.
सोशल मीडियावर मैत्री, पाससाठी 180 दिवसांपासून संसदेच्या फेऱ्या, पोलिस तपासात माहिती समोर
घुसखोरी नंतर लपण्याची योजना
संसदेत घुसखोरीची घटना घडवून आणल्यानंतर ललितने लपण्याची योजना आखली होती. या प्लॅनमध्ये महेशला राजस्थानमध्ये लपण्यास मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कैलास आणि महेश चुलत भाऊ असून, महेश हा मजुरीचे काम करतो. घटनेच्या दिवशीचे सर्व अपडेट ललित, महेश आणि कैलाश टीव्हीवर घेत होते. महेशने त्याचे ओळखपत्र वापरून गेस्ट हाऊसमध्ये ललितची राहण्याची व्यवस्था केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.