Download App

‘तुम्ही फडणवीसांविरोधात बोलाल तर गाठ…’; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane On Manoj Jarange : सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी झाली होती. शिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका झाली. आताही मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीसांना आताच शहाणं व्हावं नाहीतर मी सगळंच बाहेर काढणार, असा इशारा जरांगेंनी दिला.

‘मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन’; जाळपोळनंतर प्रकाश सोळंकेंनी दिला शब्द 

मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही जरागेंना प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांविरोधात जर तुम्ही बोलाल, भूमिका घ्याल तर गाठ या मराठ्याशी आहे, हे लक्षात असू द्या, असा इशारा राणेंनी दिला.

आज माध्यमांशी बोलतांना राणे म्हणाले, मनोज जरांगे यांना पहिल्याच दिवशी स्पष्ट केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर तुम्ही टीका केली तर ती आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही टीका कराल तर आम्हाला देखील तुमच्या डोक्यात विष कोण टाकतोय, तुमची भाषणं कोण लिहितंय? तुम्हाला मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय, याची आम्हाला पुराव्यासह यादीच काढावी लागेल, असं राणे म्हणाले.

Sharad Pawar’s birthday: शरद पवारांची सुरूवातच भावाचा पराभव करून झाली… तेथे पुतण्याचे काय? 

पुढं बोलतांना राणे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत बोलत राहाल तर आम्ही तुमचं स्वागतच करू. मात्र मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या. आणि त्यांच्याच विरोधात तुम्ही भूमिका घेत आहात. फडणवीसांविरोधात जर तुम्ही बोलाल, भूमिका घ्याल तर गाठ या मराठ्याशी आहे, हे लक्षात असू द्या, असा इशारा नितेश राणेंनी दिला.

जरांगे काय म्हणाले?
आज लातूरमध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीसांना आताच शहाणं व्हावं. नाहीतर मी सगळं बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय, हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मनाचा मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोडसाळपणा करायला सुरुवात केली आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांनी आता आपल्या लोकांना बोलायला सांगितले आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी मराठा एकत्र आहे, असं जरांगे म्हणाले.

Tags

follow us