Download App

लेट्सअप विश्लेषण : गडकरी, पंकजांची उमेदवारांच्या यादीत कशी झाली एन्ट्री? ‘हे’ फॅक्टर ठरले कळीचे मुद्दे

  • Written By: Last Updated:

मुंबई : सर्वांचे डोळे लागून राहिलेली भाजपची राज्यातील लोकसभेची यादी अखेर जाहीर झाली आहे. यात 20 उमेदवारांना संधी देण्यात आली असून, या यादीचे वैशिष्ट म्हणजे यात नितीन गडकरी (Nitin Gadkari), पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपमधून पवारांसोबत गेलेल्या एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे गडकरी, पकंजा मुंडेंची नेमकी एन्ट्री कशी झाली? त्यांची नावं सामाविष्ट भाजपचं नेमकी रणनीती काय? हे आपण जाणून घेऊया. (Nitin Gadkari Pankaja Munde Name In Maharashtra Loksabha Candidate List)

खासदारकीसाठी मोहोळ मैदानात अन् स्पर्धेतून बाद झालेल्या मुळीकांची सूचक पोस्ट चर्चेत

ठाकरेंची गडकरींना ऑफर अन्

भाजपनं लोकसभेसाठी पहिली 195 उमेदवारांची नावं जाहीर केली. यात राज्यातून भाजपचं ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे नाव असणारचं याची सगळ्यांनाच डोळे झाकून खात्री होती. पण, धक्कातंत्राचा अवलंब करत भाजपनं गडकरींना वगळलं. मात्र, याच संधीचा फायदा घेत उद्धव ठाकरेंनी थेट गडकरींनी त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर मैदानात उतरावे अशी ऑफर दिली.

गडकरींचे सर्वच पक्षातील नेत्यांशी मैत्रीचे नाते आहेत. याशिवाय शिवसेना भाजपच्या युतीत जेव्हा जेव्हा मीठाचा खडा पडला तेव्हा तेव्हा गडकरी संकटमोचक म्हणून उभे राहिले आहेत. याशिवाय त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परीचित आहे. ते काही चुकीचं घडल्यास विरोधी पक्षातील नेत्यांनाच काय तर, स्वतःच्या पक्षालाही घरचा आहेर देण्यास मागे पुढे पाहत नाही. सर्वच पक्षांशी असलेले सलोख्याचे नाते बघता आणि संघ, भाजपचे नातेसंबंध बघता भाजपला दुसऱ्या यादीतून गडकरींना डावलणं चांगलचं महागात पडलं असतं. त्यामुळे मतांवर परिणाम होण्यापेक्षा गडकरींना संधी देण्याचा मार्ग भाजपचं अवलंबल्याचे बोलले जात आहे.

Murlidhar Mohol : कसलेला पैलवान, महापौर अन् आता खासदारकीचा उमेदवार…

पंकजांमुळे फडणवीसांचं टेन्शन संपलं

गडकरींच्या नावा पाठोपाठचं सर्वात चर्चा होती ते दुसरं नाव म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडेंचं (Pankaja Munde). गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांना कोणत्याच पदावर संधी देण्याचे भाजपने टाळले होते. पक्षातील ही वागणूक बघता कधी उघडपणे तर, कधी अप्रत्यक्षपणे पंकजांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यानंतरही पक्षाकडून त्यांना हवी तशी वागणूक दिली जात नव्हती. त्यामुळे पंकजा वेगळी चूल मांडणार अशा वावड्या उठू लागल्या. जर, पंकजांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर, त्याचा थेट परिणाम भाजपच्या मतांवर होईल अशी भीती पक्षाच्या मनात होती.

पंकजा यांना चार वर्षे संधी मिळत नसल्याने त्याचा सारा रोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येत होता. आता मात्र त्यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने फडणवीस यांचेही टेन्शन गेले आहे. पंकजा यांना संधी न देण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून घेतला जात होता. मात्र त्याचे सारे खापर फडणवीस यांच्यावर फोडले जात होते. त्यातून या दोन नेत्यांतील समर्थकांत नेहमीच संघर्ष पाहावयास मिळत होता. मात्र, आता पंकजांना संधी दिल्याने फडणवीसांचं टेन्शन संपल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधींचं जीव तोडून भाषण मात्र, पवार मोबाईलमध्ये व्यस्त; भाकरी फिरवण्याची चर्चा कुणाशी?

राष्ट्रवादीची मतेही भाजपनं केली सेफ

बीडमध्ये 2009 पासून मुंडे कुटुंबातीलच खासदार आहे. गोपीनाथ मुंडे हे 2009 आणि 2014 च्या निवडणुकीतून येथून निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम या खासदार झाल्या. 2019 मध्ये पुन्हा त्यांना संधी मिळाली. त्यानंतर आता पंकजांना संधी देण्यात आली आहे. भाजपसोबतच्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा मोठा फायदा पंकजा यांना बीडमध्ये होणार असून, पंकजा यांचे राजकीय स्पर्धक मानले जाणारे धनंजय मुंडे हेच त्यांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे पंकजांना उमेदवारी देऊन एकप्रकारे भाजपनं राष्ट्रवादीचे मतदानही स्वतःकडे सेफ करून घेतले असून, संपूर्ण मुंडे कुटुंब 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याचे या निमित्ताने दिसणार आहे.

follow us