“आता सेना-भाजप युती नाही” : नितीन गडकरींची सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर कबुली; भाजप-सेना नेत्यांना जोरदार चपराक
Nitin Gadkari on BJP-Shiv Sena alliance : आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळी केली होती. शिंदेंनी केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भापजची सत्ता आली. त्यानतंर तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील बंडाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झाली. अजित पवार गटाने शिंदे-फडणवीसांशी हात मिळवणी केली. दरम्यान, भाजप-सेना युतीविषयी एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठं विधान केलं. भाजप-शिवसेना युती नसल्याचं ते म्हणाले.
“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष होते. मधल्या काळात दोन वेळा युती तुटली. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद झाले. तेव्हा शिवसेनेन कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी सेनेत बंड करून भाजपसोबत गेले. या संदर्भाने एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत गडकरींना प्रश्न विचारण्यात आला. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्री असल्यापासून राज्यात भाजप-शिवसेना युती होती. मग आताच्या भाजप-शिवसेना युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न प्रशांत दामलेंनी विचारला. त्यावर गडकरी यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते.
ते म्हणाले, शिवसेना-भाजप युती आता नााही आहे. त्यावर प्रशांत दामले यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भापजच्या युतीबाबत आठवण करून दिल्यावर, अच्छा यांच्यासोबतची युती होय… असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, पॉलिटिक्स इज अ कंपलशन, लिमिटेशन, कॉन्ट्रडिक्शन. त्यामुळं जे जे होईल ते ते पाहावं, तुका म्हणे उगी राहावे, असं मिश्किल उत्तर दिलं.
मुलाखतीदरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्यावर खूप प्रेम होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांची एक आठवण सांगितलं. ते म्हणाले, एकदा मी त्यांची भेट घेऊन माघारी फिरत होतो. तेव्हा थापा मागे धावत आला आणि साहेबांनी तुम्हाला बोलावलं, असं तो म्हणाला. मी परत बाळासाहेंबाकडे गेलो. तेव्हा ते म्हणाले, नितीन, मल तुला एक वस्तू गिफ्ट द्यायची आहे. मी काय तर त्यांनी एका शिटवर लिहिलं होत, आय डोन्ट लाईक व्हू कॅन गेट द थिंग्ज डन…. मी ते घेऊन घरी आलो आणि अनेक सहकाऱ्यांना दिलं. नितीन मला प्रॉब्लेम सांगू नकोस, काम झाली पाहिजेत, ही गोष्ट मला बाळासाहेबांनी तेव्हा सांगितली होती. ती आजही मझ्या लक्षात आहे, असं गडकरी म्हणाले.