Download App

ठाकरे गटाचे आक्षेप फेटाळले, नीलम गोऱ्हेच उपसभापती राहणार, तालिका सभापतींचा निर्णय

  • Written By: Last Updated:

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला पाठिंबा देत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल होते. दरम्यान, आता त्यांच्या पदाला कोणताही धोका नसल्याचा निर्णय तालिका अध्यक्षांनी घेतला आहे. (No suspension of Neelam Gore They will be the deputy chairperson)

https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg

नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे ह्या शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) राजीनामा देऊन शिंदे गटात सामील झाल्या. या घटनेवरून त्यांनी पक्षांतर केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळं पक्षांतर बंदी कायद्यातील विविध तरतुदीनुसार, त्यांना पदावरून अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोऱ्हे यांची बाजू घेत आक्षेप फेटाळून लावले होते.

पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले… 

या संदर्भात आज दुपारच्या सत्रात तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी आपला निर्णय दिला. ते म्हणाले, सभापती म्हणून गोऱ्हे काम करू लागल्या तेव्हा जी शिवसेना होती, त्या शिवसेनेत कोणताही बदल झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांनुसार आणि राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीच्या कलम १०२/२ अन्वये त्यांना अपात्र ठरवण्याची कोणतीही शक्यता दिसून येते नाही. त्यांना अपात्र ठरवण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्यातही तरतूद नाही. त्यामुळं पक्षांतराच्या बाबतीत घेतलेल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांना पक्षांतर केले तर ते अपात्र ठरणार नाही. या पदाला तशी कायद्यात सूट देण्यात आली आहे. शिवाय, सभापतीपदी असलेली व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसते. त्यामुळे घटनात्मक तरतुदीनुसार गोर्‍हे यांचे उपसभापती पदांचे अधिकार अबाधित राहतील, असा निर्णय तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी घेतला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नीलम गोर्‍हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या पदावर आक्षेप घेतला. मात्र आता उपसभापती पदावर नीलम गोर्‍हे कायम राहणार असल्याचा निर्णय तालिका सभापतींनी घेतला आहे

Tags

follow us