Download App

शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं…; लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट

मी उमेदवारी मागायला शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझं तिकीट फायनकलं केलं होतं. - ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके

Laxman Hake on Sharad Pawar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) देण्यास विरोध करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळई ओबीसी समाजाच्या भावना व्यक्त करत आरक्षणावर भाष्य केले. त्यांनी जरांगेंच्या मागण्या कशा चुकीच्या आहेत हे सांगितलं. याशिवाय हाकेंनी एक गौप्यस्पोटही केला. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी (Sharad Pawar) माझं तिकिट फायनल केलं होतं, असं ते म्हणाले.

आंदोलन घेऊ नका, पाठिंबा द्यायला शरद पवार येणार…; राष्ट्रवादीचा विखेंना इशारा 

आज माध्यमांशी लक्ष्मण हाके यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, मी उमेदवारी मागायला शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझं तिकीट फायनकलं केलं होतं. पुढं काय झालं ते त्यांनाच माहित, असा गौप्यस्फोट हाके यांनी केला. ते म्हणाले, माढा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी जिथून तिथे मला पाच हजार मतं मिळाली. ओबीसी समाजाचा एखादा प्रतिनिधी सभागृहात असला पाहिजे, ही भावना समाजात नाही. धनगराने कुठं खासदार व्हायचं असतं का? त्याने कुठं तिकीट मागायचं असतं का? रामोश्याने काय लोकसभेचं तिकिट मागायचं असतं का? असे प्रश्न विचारले जातात. ही समाजातली फॅक्ट आहे, असं हाकेंनी म्हटलं.

Sushant Singh Rajput : सुशांतच्या मृत्यूप्रकरणात करणी सेनेची एन्ट्री; सीबीआयला दिला थेट इशारा 

याआधीही ओबीसी समाजाचे अनेक नेते एकत्र आले आहेत. आताच्या नेत्यांनी तसं एकत्रित यायला हवं. आमच्या समाजाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आमची लोक विधानसभेत गेले तर आवडेल. किमान आमची ५० पोरं विधानसभेत गेली पाहिजे, असंही हाके म्हणाले.

समाजव्यवस्था ढासळत चालली आहे. आजही महाराष्ट्रातील ओबीसी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात एकही ओबीसी वसतिगृह नाही. सरकारने सहकरी साखर कारखान्यांना पैसे दिले. मात्र, ओबीसींना अर्थसंकल्पात काय दिलं? असा सवाल हाके यांनी विचारला.

follow us