Download App

ठाकरेंना दहा कोटी देऊन ओमराजेंना तिकीट मिळवून दिले; तानाजी सावंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

  • Written By: Last Updated:

Minister Tanaji Sawant On Omraje Nimbalkar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिव जिल्ह्यातील सभांमधून सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. त्याला आता धाराशिवचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तुझे तिकीट मिळविण्यासाठी दहा कोटी रुपयांचा चेक उद्धव ठाकरेंना दिला. तुला निवडून आणण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केले. तुला बापाची माया दिल्यानंतर लगेच तू बाप बदलला, असे सावंत म्हणाले.


भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत आले, पण भाजपने नकार दिल्यानं…; रामदास कदमांचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना मंत्री तानाजी सावंत म्हणाले, मी अयोग्यमंत्री म्हणून मी त्यावेळेसे वाटत होते. तर महाराष्ट्रातील जनतेने एेवढे आमदार देऊन चूक केली. २०१९ ते २०२२ पर्यंत तुमची मूर्खमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली होती का ? तुम्ही मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या पोटाची आग विझविण्यासाठी तू काय केले आहे. फक्त भावनिक बोलायचे. त्यावर मत मागायचे. पाच वर्ष ढुंकण बघायचे नाही.

‘खंडोजी खोपडेची अवलाद…’; रवींद्र वायकरांचे नाव घेता ठाकरेंचे टीकास्त्र

कालच्या पिढीच्या बेरोजगार खासदाराचा मी एक बाप होतो. पूर्वी दोन बाप होते. विलासराव हे एकदा बाप होतो. आता शरद पवार व उद्धव ठाकरे हे बाप झाले. किती बाप झालेत मला माहिती नाही. शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो. तानाजी सावंतांनी तुला तिकीट देण्यासाठी चेकने उद्धव ठाकरेंना दहा कोटींचा निधी दिला. तुला निवडून आणण्यासाठी एक कोटी खर्च केले. तुला बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला, अशी भाषाच तानाजी सावत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी वापरली आहे.

follow us