Download App

राज्यात लुटारूंची टोळी! बेटा अजित कितना खाया विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या..; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप मोदींनी आरोप केला. त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया असं विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची (Vidhansaba Election) जोरदार तयारी सुरू केली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Kanguva Trailer: ‘कांगुवा’चा धमाकेदार ट्रेलर कधी येणार? मेकर्सनी पोस्टर शेअर करत थेट तारीख सांगितली 

आज लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाडा आणि काँग्रेसचे नाते भावनिक आहे. मराठवाड्याने काँग्रेसचा निकाल १०० टक्के दिलाय. राज्यात सध्या लुटारूंची टोळी आहे. तेच सत्ताधारी आहेत. अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप मोदींनी आरोप केला. त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया असं विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या असं म्हणत पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांवर टीका केली. सर्वसामान्य जनता याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंनी केलं अजितदादांचं कौतुक 

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं म्हणणाऱ्या भाजपने हा महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला. मुंबईतील 10 लाख कोटींची जमीन अदानीच्या घशात घालण्याचे आणि मुंबई साफ करण्याचं पाप राज्यातील हे त्रिकूट करत आहे. बदमाश, लुटारू, चोर, दरोडेखोरांचे हे सरकार सध्या महाराष्ट्राच्या बोकांडी बसले, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यावर यांना लाडकी बहीण आठवली, असा टोला लगावत सरकारने आधी बहिणींचे रक्षण केले पाहिजे, हीच खरी लाडकी बहिण योजना ठरेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

राहुल गांधींनी मोदींना घाम फोडला आहे. मोदी घाबरतात आता. त्यांची छाती बारीक बारीक होत आहे, अशा शब्दात वडेट्टीवारांनी सरकावर टीका केली.

मराठा ओबीसी भांडण लावण्याचा प्रयत्न
राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना वडेट्टीवार यांनी सरकारने ओबीसी मराठा असे भांडण लावण्याचा प्रयत्न केला. विलासरावांनी 2004 मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम केले होते, असं म्हणत अजित पवारांवरही टीका केली.

follow us