Vijay Wadettiwar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. महाशक्तीच्या आदेशानुसार हा निर्णय झाल्याचं ते म्हणाले.
आम्ही सुरुवातीपासूनचं सांगतो होतो… शिवसेनेच्या निकालावर देवेंद्र फडणवीस थेट बोलले
राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, महाशक्तीच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महाशक्तीचा पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे हे होणं अपेक्षित होतं. एकेकाळच्या मित्रपक्षाला काही अंशी संपवण्यात भाजपला यश आलं असं त्यांना वाटत असेल. पण, मुळात एखादा पक्ष संपवणं हे सोपं नसतं. शिवाय, ठाकरे आणि शिवेसना, शिवसेना आणि ठाकरे हे एक अतुट नात आहे. शिवेसना आणि ठाकरे हे वेगळेवेगळे आहेत, हेच लोकांना मान्य होणार नाही. आजचा निकाल स्क्रिप्टेड-लिहून दिलेला आहे. हा अंतिम निकाल नाही. दोन्ही लोकांना पात्र ठरवलं कारण, एक पात्र आणि दुसरा अपात्र असं झालं असतं तर जनतेचा क्रोध ओढवला असता, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
नार्वेकरांनी दिलेला निकाल हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट; पटोलेंची सडकून टीका
हा निकाल संविधानविरोधी आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा धज्जा या निकालाने उडवला, असंही वडेट्टीवार म्हणाले.
ते म्हणाले, ठाकरेंना अपात्र ठरवण्याचा उद्देश त्यांच्याबद्दल सहानुभूती मिळू नये हा आहे. लोकशाही संपवण्याचे हे पाऊल आहे. संविधान, घटना देशात टिकेल की नाही, अशी शंका आहे. कोणातीही पक्ष फोडायचा, आमदार फोडायचं आणि सरकार स्थापन करणं हे लोकशाही घातक आहे. हा निकाल अंतिम नाही. ठाकरे सुप्रीम कोर्टात आहे. आमच्यासाठी शिवसेना ठाकरेंचीच आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. या निकालाचा जागा वाटपावार कोणताही परिणाम होणार नाही. आजच्या निकालाचं वाचन हे इंग्रजाीतून झालं हे चूकीचं आहे, असं वटेट्टीवार म्हणाले.
नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल अपेक्षितच होता. या निकालामुळं देशाची लोकशाही धोक्यात येईल. उद्धव ठाकरेंची बाजू भक्कम आहे. या या क्षणाला महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची सहानुभूती ठाकरेंच्या पाठीशी आहे. आणि ही काही केवळ उद्धव ठाकरेंची लढाई नाही. तर हा लोकशाहीच्या रक्षणाचा लढा आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागावी. लोकशाही जिंकेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.