Opposition On First Day Of budget Session Of Legislature : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget Session Of Legislature) आजपासून सुरू झालंय. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) शांत असल्याचं पाहायला मिळालं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर कोणतंही आंदोलन झालं नाही. त्यामुळे विरोधक (Mahavikas Aghadi) कमकुवत असल्याची भावना निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेता पदासाठी अजूनही विरोधकांमध्ये एकमत नाही. विरोधी पक्षनेता कोण होणार, यावर संभ्रम कायम असल्याचं दिसत आहे.
काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद हवे, पण…
विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने आपला दावा सांगितला असला तरी, शिवसेना (ठाकरे गट) त्यासाठी तयार नाही. कारण ठाकरे शिवसेनाकडे विधानसभेत आमदार संख्या जास्त (Maharashtra Politics) आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका वेगळीच दिसत आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधक पहिल्याच दिवशी शांत असल्याचे पाहायला मिळाले.
सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार होणार विरोधी पक्षनेते निवड?
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, भाजपाला आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते म्हणून पाहणे सोयीस्कर वाटेल. कारण, आदित्य ठाकरे हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करतील, त्यामुळे भाजपा सुरक्षित राहील.
अहिल्यानगरमध्ये खाकीचा वचक संपला? कोतकर कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघे जखमी
विरोधकांत फूट – सत्ताधाऱ्यांचा फायदा?
विरोधी पक्षांमध्ये स्पष्ट एकजूट नसल्याने सत्ताधारी पक्षाला फायदा होणार आहे. विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याचा निर्णय आता राजकीय समीकरणांवर आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर अवलंबून आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासंदर्भातला निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील.