Download App

पाकिस्तान थांबायचं नाव घेईना! सलग 7 व्या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार

Pakistan Violates Cease Fire Along Loc 7th Consecutive Night : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध खूपच बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन (Pahalgam Terror Attack) करत आहे. गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून (India Pakistan War) योग्य उत्तर दिले जात आहे. आज गुरुवारी सीमेपलीकडून नियंत्रण रेषेवर तीन बाजूंनी गोळीबार झाला.

पाकिस्तान आपल्या कृतींपासून थांबत नाहीये. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये तसेच काश्मीरमधील कुपवाडा आणि उरी येथे पाकिस्तानकडून गोळीबार झाला आहे. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.

‘या’ राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, भाग्य उजळणार; तुमच्या राशीत काय?

चिथावणी न देता गोळीबार
गेल्या 7 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा, बारामुल्ला आणि जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेचे सतत उल्लंघन केले जात आहे. ज्याला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानी सैन्याने या तीन भागांमधून नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांचा विनाकारण गोळीबार केला आणि सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

मागील महिन्यात 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढत्या तणावात भर पडली असून, पाकिस्तानी सैन्याने बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकारण गोळीबार केला. मंगळवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) सीमेपलीकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांवर चर्चा केली. नंतर पाकिस्तानी सैन्याला विनाकारण गोळीबार करू नये असा इशारा दिला, असे डीजीएमओ चर्चेशी परिचित असलेल्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

महाराष्ट्राला जागं करण्यासाठी येताहेत…पुन्हा शिवाजीराजे भोसले! सिद्धार्थ बोडके साकारणार मुख्य भूमिका

पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे 2003 च्या युद्धबंदी कराराला धोका निर्माण झाला आहे, जो 740 किमी लांबीच्या सीमेवर तणाव वाढल्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये दोन्ही बाजूंनी लागू करण्यात आला होता. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे सुचवत असताना गोळीबाराची ही घटना घडली आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना दहशतवादाविरुद्धच्या नवी दिल्लीच्या लढाईत वॉशिंग्टनच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले.

 

follow us