Download App

व्हायरल ऑडिओ क्लीपवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाले, धनंजय मुंडेंनी …

Pankaja Munde Viral Audio Clip : बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी महायुतीकडून पंकजा मुंडे

Pankaja Munde Viral Audio Clip : बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Loksabha 2024) चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी महायुतीकडून (Mahayuti) पंकजा मुंडे (Pankaja Munde) निवडणुकीच्या रिंगणात आहे. यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) पंकजा मुंडेंची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लीपमध्ये पंकजा मुंडे अपक्ष उमेदवार रविकांत राठोड (Ravikant Rathore) यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करत आहे. मात्र सोशल मीडियावर ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी निवडणूक आयोगाने या प्रकरणात दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. तर आता ऑडिओ क्लीप व्हायरल प्रकरणात पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

या प्रकरणात बोलताना पंकजा मुंडे म्हणाले, तुम्ही हजार वेळा ही क्लिप ऐकल्यावरही तुम्हाला यात काहीही नाही हे कळेल, माझ्या माहितीप्रमाणे ते (रविकांत राठोड) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे, मंत्री धनंजय मुंडे यांचे ते समर्थक आहे. महायुती असल्याने मुंडेंच्या टीमने त्यांच्याशी संपर्क केला होता, मात्र त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंनी स्वतः बोलावे असे सांगितले. त्यामुळे मी त्यांना फोन करून बोलले. मात्र माझा आणि त्यांचा काहीच परिचय नाही, माझ्याकडे त्यांच्या नंबर देखील नाही किंवा संपर्कही नाही. माझ्या कार्यकर्त्याने त्यांना फोन लावून दिला तेव्हा मी त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी अगदी निस्पृहपणे बोलत होते. त्या क्लिपमध्ये मी म्हणाले आहे की, माझ्या औकातीप्रमाणे मी त्यांना मदत करेल, असे आश्वासन मी त्यांना दिले. असं पंकजा मुंडे म्हणाले. याच बरोबर त्यांनी मोदींची सभा झाल्यावरच ही क्लिप व्हायरल का झाली?, असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाले, ही निवडणूक पीकवर असताना ही क्लिप बाहेर आली हे आपण बघितले पाहिजे, धनंजय मुंडे यांनी मला सांगितल्यामुळे मी बोलले, त्यात आमचा सहकारी असलेल्या पक्षाचा उमेदवार नसावा अशी भावना प्रत्येकाची असते असं देखील या प्रकरणात पंकजा मुंडे म्हणाले.

ऑडिओ क्लीपमध्ये काय आहे?

पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांना फॉर्म काढून घेण्यासंदर्भात विनंती केली आणि बंजारा समाजाची मतंही मलाच मिळणार आहेत त्यातले दहा पाच हजार मतं घेऊन फार काही होणार नाही, असं या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये पंकजा मुंडे म्हणत आहे.

Air India Express Strike : … म्हणून एअर इंडियाचे कर्मचारी टाटांच्या विरोधात घेत आहेत सामूहिक रजा

follow us

वेब स्टोरीज