Parliment session : काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांचा हात धरला आहे. अजित पवारांसोबतच पटेलही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहे. राज्यात एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता राज्यसभा आणि लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल हे विरोधकांच्या बाकावर बसल्याचं दिसून आले आहेत. विशेष म्हणजे पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबत बसले होते. त्यामुळे एनडीए सरकारला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे खासदार पटेल विरोधी बाकावर कसे बसले? पटेल शरद पवार गटासोबत बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंडे-रोहित पवारांमध्ये वाकयुद्ध! पवारांनी ‘जबाबदारी कशी’ विचारताच मुंडेंनी थेट मतदारसंघच काढला…
काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची साथ सोडत प्रफुल्ल पटेल अजितदादांच्या गटासोबत सत्तेत सामिल झाले. अजित पवारांसोबत इतरही अनेक दिग्गज नेते सत्तेत सहभागी झाले आहेत. यामध्ये खासदार सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ, आमदार हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांच्या गटाने शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत सत्तेत सामिल झाले आहेत.
थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…
एवढंच नाहीतर अजित पवार गटातील 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली असून त्यांना खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहेत. अशातच आता विधानसभेसह लोकसभा, राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालंय. अधिवेशनादरम्यान, विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर प्रश्नांचा चांगलाच भडीमार होत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा सुरु आहे.
इर्शाळवाडीच्या बचावलेल्या नागरिकांचा वनविभागावर मोठा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी
अशातच सत्तेत सामिल झालेला खासदार सत्ताधारी बाकांवर बसणं सोडून विरोधी बाकावर बसत असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे राज्यसभेत ज्या बाकांवर शरद पवार नेहमी बसतात, त्याच बाकावर प्रफुल्ल पटेल बसल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सामिल होताच शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली होती. दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादीतून बडतर्फ केलं त्यानंतर तत्काळ अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये शिवसेना पक्षासारखाच वाद होणार असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांच्या यादीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट तर दुसरीकडे एनडीएला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या यादीत अजित पवार गट आहे. नूकत्याच नवी दिल्लीत एनडीएच्या बैठकीत अजित पवार गटाने हजेरी लावत आपण एनडीएसोबतच असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर आता अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या आजच्या राज्यसभेतल्या आसनावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.