Parth Pawar On Praful Patel and Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party ) सध्या पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Pate) यांची पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढून घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना झुकते माप देण्याच्या मुद्द्यावरून पक्षात आता स्पष्टपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या अंतर्गत संघर्षामुळे सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आता त्यावर राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभेवर गेलेले पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
या सगळ्यावर पार्थ पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय, निराधार बातम्या आणि केवळ तर्क-वितर्कांवर कथा रचून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांचे अनेक दशकांचे योगदान आम्हाला मार्गदर्शन करत आहे. या नेत्यांना वादात ओढणे हे अत्यंत दुर्देवी आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादात पार्थ पवार यांच्या ट्वीटला महत्त्व आले आहे. कारण राष्ट्रवादीतील वादावर पार्थ पवार हे पहिल्यांदाच बोलले आहे. पार्थ पवार यांच्या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष नाही, त्यांच्याविरोधात वावड्या उठविल्या जात असल्याचे असल्याचा पार्थ पवार यांना म्हणायचे असल्याचे यातून दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) पवार) गटाकडून पटेल आणि तटकरे यांना टार्गेट केले जात आहे. त्यात पार्थ पवार यांनी दोन्ही नेत्यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction.
Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all.
Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate…
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 2, 2026
दोन्ही नेते अडचणीत का ?
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले आहे. 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कोणताही अधिकृत पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी आग्रही विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. घटनेतील बदलांमुळे अधिकारांच्या वाटपावरून हा वाद विकोपाला गेल्याचे समजते. या वादावर पडदा टाकण्यासाठी दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ताज्या पत्रात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाचा उल्लेखच नसल्याने प्रफुल पटेल यांच्या भूमिकेबाबत, पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पत्रात फक्त राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचाच उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या पत्रात प्रफुल पटेल यांचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून स्पष्ट उल्लेख होता, त्यामुळे पक्षातील अंतर्गत बदलांविषयी चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु आता पर्थ पवार यांच्या ट्वीटमुळे या चर्चा थांबवू शकतात, असा प्रश्न आहे.
