Download App

आर. ओ पाटील रुग्णालयात असतांना मातोश्रीवरून साधी दखलही घेतली नाही; किशोर पाटलांची घणाघाती टीका

  • Written By: Last Updated:

Patil was in the hospital, Matoshree did not even take a simple notice: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचारो येथे विराट सभा होणार आहे. तसेच दिवंगत आमदार आर. ओ पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. आर. ओ पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या वैशाली सुर्यवंशी (Vaishali Suryavanshi) यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. ठाकरेंच्या सभेमुळं जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

पाटील म्हणाले, माझ्यावर संस्कार असल्यानं उद्धव ठाकरेंचं स्वागत करत आहे. पण, साडेतीन वर्षापूर्वी आर. ओ पाटील यांचं निधन झालं. ते पाचोरा मतदारसंघाचे 10 वर्ष आमदार होते. मात्र, आर. ओर पाटील यांना कॅन्सरचं निदान झाल्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात असतांना उध्दव ठाकरेंना आर. ओ पाटील आठवण काढत असल्याची सातत्याने माहिती दिली. परंतु, याची साधी दखलही मातोश्रीवरून घेण्यात आलं नाही, अशा शब्दात उद्धव ठाकेरंवर निशाणा साधला.

पाटील यांनी सांगितले की, दिवंगत आमदार आर. ओ पाटील हे माझे पिता व गुरू असून त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचे स्वागतच असून त्यांच्या सभेला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची आम्ही खरबदारी घेऊ, असं पाटील यांनी सांगितल.

Nilesh Lanke यांचे कौतुक करताना विजय औटी थकले नाहीत

शिवसेनेत बंड झाल्यानंतर तुमच्याविरोधात भगिनी वैशाली सुर्यवंशी उभे राहिल्याचं पाहायला मिळत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर किशोर पाटील यांनी सांगितलं की, ज्या कालपर्यंत सर्वांना शिव्या घालत होत्या की, माझ्या वडिलांच्या निधनानंतर साधी विचारपूस करण्यासाठी कोणीही आलं नाही. ती मुलगी जेव्हा ठाकरेंच्या पक्षात जाऊन कट्टर शिवसैनिक समजते, हे माझं दर्दैव असल्याचं ते म्हणाले.

निवडणुक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दोन्ही गटाकगडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाने कायम शिंदे गटाला गद्दार, 40 चोर असं संबोधलं. उध्दव ठाकरें हे देखील 40 गद्दारांनी शिवसेना पक्ष चोरला, धनुष्यबाण चिन्हही चोरले, पण बाप कोणी चोरतो का? या 40 गद्दारांनी माझा बाापही चोरला. काय वाटत असेल त्यांच्या वडिलांना जे दुसऱ्यांचे बाप चोरतात, बाळासाहेबांचे नाव न घेता निवडणूक लढवून दाखवा, अशी टीका केली जाते. या टिकेला उत्तर देतांना पाटील यांनी सांगितलं की, राज्यातील जनता ठाकरेंच्या भाषणाला त्रस्त झाली आहे. एखाद्या लहान मुलासारखं माझा बाप चोरल्याचं ठाकरें सांगतात. ज्याला बाप सांभाळता येत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळेल, अशी टीका किशोर पाटील यांनी केली.

Tags

follow us