Nilesh Lanke यांचे कौतुक करताना विजय औटी थकले नाहीत

Nilesh Lanke यांचे कौतुक करताना विजय औटी थकले नाहीत

Vijay Outi is not tired of praising Nilesh Lanke पारनेर तालुका बाजार समिती (Parner Taluka Market Committee) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत खा. सुजय विखे (sujay vikhe) यांनी भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा केला. त्या विरोधात राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हा एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित निर्माण झाला होता. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) हे दोन मातब्बर विरोधक एकत्र आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, बाजार समितीची निवडणूक आपणच जिंकणार आहोत. कारण हा लोकप्रतिनिधी लंकेंच्या अब्रूचा प्रश्न आहे. आज त्यांनी राज्य पातळीवर स्वतःच्या कर्तुत्वाने वलय निर्माण केले, ते टिकवणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही ज्या दिवशी एक झालो, त्या दिवशी समोरचे हरले, असा टोला आ. विजय औटी भाजपला लगावला.

बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रम सभेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना विजय औटी म्हणाले की, शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. आम्ही आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. वरून आदेश आला की, मार्केट कमिटीला भाजप सोबत जायचे नाही. इकडे राष्ट्रवादीसोबत जमून घ्या. पक्षाचा आदेश आम्हाला मान्य असल्यानं आ. लंके यांच्यासोबत समेट घडवून आणला. आम्ही दोघे एकत्र आल्यानं आपली ताकद वाढली आहे. त्याचा धसका भाजपने घेतल्याचं औटी म्हणाले.

ते म्हणाले, मागच्या तीनही निवडणुकात आम्ही दोघांनी एकत्र काम केले. चौथ्या निवडणुकीत मला पाडूनही टाकले. पण, इतरांना काय अडचण आहे. आमचे आमच्यात आम्ही काहीही करू. तुमचे दुखायचे कारण काय,हे मला समजत नसल्याचे नाही, असं म्हणत भाजपला टोला लगावला. जोपर्यंत महाविकास आघाडी अस्तित्वात आहे, तोपर्यंत या तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील, राज्यातील नेत्यांना अडचण नसेल तर आम्हाला देखील काही अडचण नाही, असं ओटी यांनी सांगितले.

सत्तेसाठी सेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करली; सुजय विखेंनी डागली तोफ

आ. निलेश लंके बोलताना म्हणाले की, निकालाची काळजी करू नका. आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर अनेकांचे फोन आले की तुमचे पॅनल बहुमताने निवडून येईल. मात्र, बहुमत मिळणारच आहे मात्र समोरच्यांना अल्पमतात ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडी असतांनाही एकमेकांच्या विरोधात काम करत होतो ही मनामध्ये खंत होती. मात्र, हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. बऱ्याच जणांना औटी आणि लंके कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, असं वाटत होतं. पण राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो अन् शत्रूही नसतो, असं लंके म्हणाले.

लंके म्हणाले, आपल्याकडे उत्तरेचे वारे सुरू झालेले आहे. ते फक्त त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या तालुक्यात संघर्ष लावून देण्याचे काम करत आहेत. बाहेरून आलेली शक्ती आपल्या मतदारसंघात काम करत आहे. आता त्यांना त्यांची जागा या निवडुकीत दाखवून द्यायची आहे, असं म्हणत प्रत्यक्षपणे खा. सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काहींना या निवडणुका स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढायचे आहे. काहींना स्वार्थासाठी लढायचे आहे. मात्र, आमचे हित एकच आहे, ते म्हणजे शेतकऱ्याला बाजार समितीत न्याय मिळाला पाहिजे, असं लंके यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube