मुंबई : ‘दुसरं काय सकाळ झाली की, आपल्याला काही तरी बोलाचं असतं. कोणतीही घटना झाली की सत्ताधारी, सत्ताधारी एवढचं बोलायचं. खरं म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्याला बोलण्याला आता कोणीही महत्त्वही देत नाही. वारंवारं तेच तेच त्यांची वायफळ बडबड ऐकून लोकंही त्यांना कंटाळलेले आहेत. पण दररोज काही तरी बोलायचं काही तरी आरोप करायचे म्हणून त्यांचं हे चाललेलं आहे.’ अशी टीका मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना खासदाक संजय राऊत यांच्यावर केले आहेत.
रत्नागिरी येथे पत्रकाराची हत्या करणाऱ्या आरोपीला राजाश्रय मिळतोय का ? असा आरोप संजय राऊत यांनी ट्विट करत केलाय. हा आरोप म्हणजे निव्वळ बिनबुडाचा आहे. असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. सकाळी उठायचं आणि बडबड सुरु करायची असा हा प्रकार असल्याचा ते म्हणाले. ही घटना घडल्यानंतर उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अटक केली. ही केस फ़ास्ट ट्रक कोर्टात चालावी ही देखील भूमिका मांडली. हे पाहता संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असाही महाजन म्हणाले.
Kirit Somaiya : ‘जवाब तो देनाही पडेगा’ : सोमय्यांचा मुश्रीफांवर निशाणा
दरम्यान शिवसेना खासदाक संजय राऊत म्हणाले होते की, पत्रकार शशिकांत वारिसे यांनी रत्नागिरीतील काही राजकारणी रिफायनरी समर्थक यांचा या जमिनी घेण्यात कसा हात भार आहे ? या संदर्भात त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते या भागातल्या राजकारण्यांच्या डोळ्यात खूपत होते. पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी रिफायनरी आणणारच याची सुपारी घेतली होती. लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. हा योगायोग समजायचा का ? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता.