दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 1,835 कोटी जमा

PM Kisan 24th Installment Maharashtra;महाराष्ट्रातील 91,12,765 शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानच्या 24 व्या हप्त्याचे 1,835 कोटी रुपये जमा.

PM Kisan 24th Installment Maharashtra

PM Kisan 24th Installment Maharashtra

PM Kisan 24th Installment Maharashtra: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील बनासकांठा येथील कार्यक्रमातून वितरित केला. याअंतर्गत महाराष्ट्रातील 91 लाख 12 हजार 765 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत 1 हजार 835 कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.

न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा मोठा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यर गोलंदाजांवर नाराज

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता शेतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन व्यवस्था, पशुपालन आणि शेतीशी जोडलेल्या पूरक व्यवसायांनाही प्रोत्साहन देत असल्याचे मोदी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत केंद्राच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक लाभ झाला आहे किंवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे, असेही ते म्हणाले.

देशातील 85 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत. अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा मोठा आधार मिळत असून, आतापर्यंत जवळपास 4 लाख कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमती वाढल्या असतानाही त्याचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठी सरकारने सुमारे 16 लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या 12 वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून 24 लाख कोटी रुपये देण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

महायुतीतील वादावर एकनाथ शिंदेंनी दिला पूर्णविराम! म्हणाले, ‘मित्रपक्षावर चिखलफेक बंद करा’

शेतीतील नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची ठरत असल्याचे सांगत, गेल्या 10 वर्षांत या योजनेतून शेतकऱ्यांना 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सिंचनासाठी लागणारा खर्च कमी व्हावा, यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 12 लाख सौरपंप देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे 80 कोटी लिटरपेक्षा जास्त डिझेल वाचले असून, अतिरिक्त वीज निर्मितीतूनही त्यांना उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी सुमारे 3 हजार नव्या बियाण्यांच्या जाती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतीसोबत पशुपालनालाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक पद्धतीने प्रजनन करण्यावर भर दिला जात आहे. पशुधनाला लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचवण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 150 कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, 8 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा फायदा झाला आहे.

दुसऱ्याच्या डिग्रीवर स्वतःचं नाव, बीडमध्ये बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १८ तासांच्या तपासानंतर अटक

देशातील गाय आणि म्हशींच्या दूध उत्पादनातही वाढ झाल्याचे मोदी यांनी सांगितले. 2013-14 मध्ये प्रतिदिन सरासरी पाच लिटरपेक्षाही कमी असलेले दूध उत्पादन आता जवळपास आठ लिटरपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’मध्ये नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

Exit mobile version