PM Modi : गेल्या 10 वर्षात भारत बदलला असल्याची चर्चा आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, मात्र आता अटल सेतू प्रकल्पाची चर्चा होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ((PM Modi) कॉंग्रेसवर निशाणा साधला. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज मोदींनी उद्घाटन केले. त्यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
पंतप्रधान मोदी आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. याठिकाणी बहुचर्चित अटल सेतूचं उद्घाटनानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस अन् अजित पवारांचं कौतुक केलं. तसेच प्रकल्पांच्या रखडण्यावरून कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, पुर्वीच्या सरकारमध्ये प्रकल्प कित्येक काळ रखडलेला असायचा. त्याचा खर्चही दुप्पट व्हायचा मात्र डबल इंजिन सरकार आल्याने राज्यात अनेक प्रकल्पांची पुर्ती झाली. असं म्हणत त्यांनी शिंदे, फडणवीस अन् अजित पवारांचं कौतुक केलं.
राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर; नाना पटोलेंचं टीकास्त्र
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशाला जगातील सगळ्यात मोठ्या समुद्री पूल मिळाला आहे. या पुलाचं भूमिपूजन झालं. त्यावेळी मी म्हटलं होतं की, देश बदलणार आहे. कारण या देशाच्या व्यवस्थेला काम थांबवण्याची सवय लागली होती. त्यामुळे मोठे-मोठे प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या देशवासीयांच्या आपेक्षा संपल्या होत्या. पण मोदीची गॅरंटी आहे. म्हणून देश बदलत आहे.
प्रवास होणार वेगवान… अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनाला किती टोल?
तर महाराष्ट्राचा विकास करणारे अनेक मोठे प्रोजेक्ट हे महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आलं. त्यावेळी सुरू झाले होते. त्यामुळे या प्रकल्पांचं पूर्ण होणं. हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या संपूर्ण टीमचं यश आहे. मी त्या सगळ्यांचा अभिनंदन करतो. तसेच यावेळी मोदी यांनी अटल सेतू या प्रकल्पामध्ये भागीदारी निभावणाऱ्या जपान सरकारचेही आभार मानले. यावेळी त्यांनी जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो अॅबे यांची आठवण काढली.
Baipan Bhari Deva: जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकात झळकले दिग्दर्शक साई-पियूष अन् केदार शिंदे
दहा वर्षांपूर्वीचा भारत आठवला तर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांची चर्चा होती. तर आता कोट्यावधी रुपयांच्या प्रोजेक्ट पूर्ण झाल्याची चर्चा होते. देशावर गेल्या कित्येक वर्ष राज्य करणाऱ्या लोकांनी देशातील लोकांचा वेळ आणि करदात्यांचा पैसा वाया घालवला आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारमधील प्रकल्प एकतर पूर्ण होत नव्हते किंवा रखडलेले राहत होते. महाराष्ट्र अशा अनेक अर्धवट प्रकल्पांचा साक्षीदार आहे.
अबकी बार ‘400 पार’ ची जबाबदारी आमची; CM शिंदेंनी मोदींसमोर फोडला लोकसभा निवडणुकांचा नारळ
ज्यामध्ये निळवंडे प्रकल्प पाच दशकांपूर्वी सुरू झाला होता. उरण खारकोपर रेल्वे लाईन तीन दशकांपूर्वी सुरू झाला होता. नवी मुंबई मेट्रो प्रोजेक्ट ही अनेक दिवस रखडला होता. त्याचबरोबर आज पूर्ण झालेला. अटल सेतू प्रकल्पाचं प्लॅनिंग देखील कित्येक वर्षांपासून चालू होतं. पण या सर्व प्रकल्पांना पूर्ण करण्याचं भाग्य आमच्या सरकारला मिळालं.
तर दुसरीकडे अटल सेतूपेक्षा जवळपास पाच पटीने लहान असणारा वरळी- वांद्रा सी लिंग प्रोजेक्टला पहिल्या सरकारने दहा वर्षांहून अधिक काळ लावला. ज्यामुळे त्या प्रकल्पाचा बजेट हे चार ते पाच पटीने वाढलं होतं. अशाप्रकारे पूर्वीच्या सरकारची काम करण्याची पद्धत होती. हा सर्व पाढाच वाचून दाखवत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात रखडलेल्या प्रकल्पां टीका केली.