Download App

‘विरोधकांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार’; PM मोदींचा घणाघात

Pm Narendra Modi On Congress : विरोधकांकडून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरही बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपूरमधील रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मोदींनी हजेरी लावली. यावेळी जाहीर सभेत भाजपचे दिग्गज नेतेमंडळीही उपस्थित होते. जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर हल्ला चढविला आहे.

कॉंग्रेस नेतृत्वाला ग्राउंड रिॲलिटीचे भान नसल्यानेच १७ जागा…; अशोक चव्हाणांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तब्बल पाचशे वर्षानंतर असा योग आला आहे की, अयोध्येमध्ये प्रभू रामलल्ला टेन्टमध्ये नाही तर भव्य मंदिरात दर्शन देणार आहेत. अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्याचा संंपूर्ण देशवासियांना आनंद होत आहे, पण रामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी काँग्रेस आघाडीने बहिष्कार केला होता, निमंत्रणही स्विकारलं नव्हतं. हे लोकं सनातनावर हल्ला करतात, सनातन संपवणाऱ्यांसोबत रॅली काढत असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला आहे.

Praksha Ambedkar : चर्चा झाली निर्णय त्यांनी घ्यावा; विशाल पाटील वंचितकडून लढणार? आंबेडकरांचे स्पष्ट संकेत

अयोध्येतील राम मंदिरासाठी काँग्रेसला निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण स्विकारलं नाही. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशी मिळून महायुती एकत्रित काम करीत आहे. महायुती तुमचं मत जिंकण्यासाठी तर आहेच पण विरोधकांना शिक्षा देण्यासाठीही असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो! डॉक्टरांची निवडणूक ड्युटी, राज ठाकरे भडकले

मोदींना शिव्या दिल्यावर समजायचं पुन्हा मोदीच…
इंडिया आघाडीसह इतर नेत्यांकडून मोदींच्या नावाचा जयघोष केला जात आहे. मोदी पंतप्रधान झाला की, लगेच लोकशाही आणि संविधान धोक्यात आलं आहे. ही इंडिया आघाडी देशाला खंड खंड करणार असल्याचीही टीका पंतप्रधान मोदींनी यावेळी केली आहे. तसेच परिवारवादी पक्षांकडून संविधानाच्या भावनेचा अपमान केला जातोयं, शत प्रतिशद सामाजिक न्याय हाच खरा निधर्मीवाद असून शत प्रतिशत समाजिक न्यायातून भ्रष्टाचाराचा अंत केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले आहेत.

follow us