Download App

मुंबईत PM मोदींना जिवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi Received Death Threat In Mumbai : राज्यात सध्या सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती मिळतेय. राज्यात आता मुख्यंमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याल पंतप्रधान मोदी येण्याची शक्यता आहे. अशातच आता हा धमकीचा फोन आल्याने (Mumbai Police) राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात (PM Modi News) आलीय. मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा महिला कॉलरने दावा केलाय. या कॉल प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील सुरू केली आहे.

जाणत्या राजाने जनाधार गमावला, आता राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावं; विखेंचा पवारांना टोला

मुंबईच्या आंबोली पोलिसांनी महिलेला अटक केली. पोलिसांनी महिलेची चौकशी केली, तिची पार्श्वभूमी देखील तपासली परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही.
कौटुंबिक समस्यांमुळे पीडित महिलेने असा फोन केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही घटना आज सकाळी घडलेली आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही धमकी देण्यात आली. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यापूर्वीही अशा धमक्या आल्या आहेत. यावेळीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवण्यात आलेय. आता पोलीस अधिकाऱ्यांनी या फोनची गंभीर दखल घेत तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. याशिवाय फोन कॉल ट्रेस करण्यासाठी तांत्रिक माध्यमांचा वापर केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

ज्याची काळजी होती ते घडलंच, रजनीकांतच्या मुलीचा संसार मोडला; कोर्टाचा निर्णय

मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत धमकावणे आणि दहशत माजवणे यासह गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. या प्रकारांची गांभीर्याने चौकशी केली जात आहे, कारण हे कायद्याचे उल्लंघन तर आहेच, पण त्यामुळे समाजात भीतीचे वातावरणही निर्माण होत आहे. या प्रकरणावर पोलिसांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे आणि आरोपींना लवकरच पकडले जाण्याची अपेक्षा आहे.

 

follow us