Police Security in Aurangzeb’s tomb Area In Khultabad : राज्यात सध्या औरंगजेब (Aurangzeb’s tomb) आणि त्याची कबर यावरून वातावरण तापलेलं आहे. अनेकांनी ही कबर पाडण्याचा इशारा दिलाय, तर बरेचजण ही कबर उद्ध्वस्त करायला मनाई करत (Chhatrapati Sambhajinagar News) आहेत. या पार्श्वभूमीवर आता औरंगजेब कबर परिसरात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आलाय. खुलताबादमध्ये (Khultabad) आता पोलीस यंत्रणा हायअलर्टवर आहे.
खुलताबादमध्ये ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. येथे केवळ एकच माणूस प्रवेश करू शकेल, अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आलाय. तिथे एकाचवेळी जास्त लोकं प्रवेश करू शकणारी, अशी व्यवस्था केलीय. तर कबरीजवळ जाण्यास मनाई करण्यात आलीय. त्यामुळं आता औरंगजेबाच्या कबरीची पाहणी बाहेरूनच करावी लागणार असल्याची माहिती मिळतेय.
त्यांना देशाच्या इतिहास तरी माहितेय का? औरंगजेबाच्या कबरीवरून विखेंचा रोहित पवारांना टोला
भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडण्याची मागणी केलीय, तर अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचं वक्तव्य केलंय. तर आमदार रोहित पवार यांनी कबरीला हात न लावणंच योग्य राहील, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्येच यासंदर्भात एकमत नसल्याचं दिसतंय.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय की, औरंगजेब स्वराज्यावर चाल करून आला होता. त्याची कबर इथेच बनलीय. जगाला हा इतिहास कळायला पाहिजे. कोणाच्याही विरोधात जाणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलीय. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, हा निर्णय बजरंग दलाचा आहे. आमचं सरकार याबद्दल विचार करेल. निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे. जो निर्णय होईल, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू.
गणपती बाप्पा आणि खंडोबाच्या चरणी माथा टेकवला, सुरजने केली ‘झापुक झुपूक’च्या प्रमोशनला सुरूवात
कॉंग्रेसचे खासदार कल्याण काळे म्हणाले की, हा चर्चा करण्यासारखा विषय नाही. निवडणुका जवळ आल्यानंतर कबर दिसते. परंतु हे सगळे मुद्दे केवळ निवडणुका आणि राजकारण यापुरत्याच मर्यादित असतात. आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आल्यानंतर कबरीचा विषय सुरू झाल्याची टीका खासदार काळे यांनी केलीय.