न्यायालयाच्या निकालावर संशय म्हणजे मूर्खपणा…माणिकराव कोकाटे संतापले, विरोधकांकडून राजकीय षडयंत्र

Manikrao Kokate Said Foolish To Doubt On Court Verdict : नाशिक न्यायालयाने (Nashik Court) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोकाटेंची (Manikrao Kokate) आमदारकी रद्द होणार असल्याची रंगली होती. दरम्यान न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. परंतु यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारताच मंत्री कोकाटे भडकले असल्याचं समोर आलंय.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे (Maharashtra Politics) मुर्खपणा आहे. निकाल अद्याप लागलेला नाही, स्थागिती देण्यात आली आहे. विरोधक, मिडीयाकडून तेच तेच सुरू आहे. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मुर्खपणा असून, राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरु असल्याचा आरोप देखील माणिकराव कोकाटे यांनी केलाय.
Biofuel Circle : बायोफ्युएल सर्कल जैवइंधन क्षेत्रातील डिजिटल प्लॅटफॉर्म, काय आहे प्रयोग?
कोकाटे म्हणाले की, रस्ते, पाटबंधारे, मार्केट कमिटी विविध प्रकल्प यासाठी जमीन लागत असते. या गोष्टी हवेत होऊ शकत नाही. त्यामुळे जेवढी प्रगती कराल, जेवढ्या गोष्टी कराल तेवढ्या जमिनी उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्यादृष्टीतून तेवढी जमीन कमी होणं, माझ्या दृष्टीने साहजिक आहे. आता कामे थांबवू शकत नाही, समृद्धी हायवे थांबवू शकत नाही, नव्याने शक्तिपीठ होत असल्याचं देखील कोकाटेंनी स्पष्ट केलंय.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी मी या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू केलंय. इथले प्रश्न राज्य पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आमचा स्टाफ असेल. मी देखील आठवड्यातून दोन दिवस या ठिकाणी उपलब्ध असेल, असं देखील कोकाटे यांनी म्हटलंय.
आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ; नामविस्ताराला एकमुखी कडाडून विरोध, अधिसभेत जोरदार विरोध
शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या माध्यमातून मला आकडेवारी माहिती झाली, मी माहिती घेतो आणि मग बोलतो. प्रत्येक केस वेगळी असते, मी केस प्रमाणे माहिती घेऊन आपल्याशी बोलेल, असं देखील त्यांनी म्हटलंय. सोबत अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा देखील कोकाटेंनी बोलून दाखवली आहे. कोणत्या पक्षाच्या नेत्यांना मंत्र्यांना वाटणार नाही, आमच्या सर्वांची अपेक्षा आहे दादांनी या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. जो तो ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत असतो, राज्यातील जनतेने दादांच्या पाठीशी उभं राहावं, अशी आमची मनापासून धारणा असल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय.