Download App

‘माफी द्यायची की नाही, हे आम्ही ठरवणार, Sanjay Raut यांनी फडणवीसांना सुनावलं

मुंबई : भाजपने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा प्रमुख पक्ष फोडला. मराठी माणूस, मराठी माणसाचा स्वाभिमान असणाऱ्या पक्षाचेच अस्तित्त्व संपवण्याचा प्रयत्न या भाजपने केला. यासाठी तपास यंत्रणांचा, पैशांचा गैरवापर केला. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर (maharashtra political crisis) आघात केला आहे. यामुळे त्यांना माफ करायचे की नाही, हे आम्ही ठरवणार. असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना सुनावलं.

नागालँडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये स्थानिक एनडीपीपी आणि भाजपा आघाडीला बहुमत मिळालं आहे. या आघाडीला ३७ जागा मिळाले आहेत. तर ७ जागा तिसऱ्या स्थानी असणाऱ्या राष्ट्रवादीने विजयी आघाडीला पाठिंबा दिला. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत.यावर शरद पवारांनी भूमिका मांडल्यावर त्यावर आज महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

नेमकं नागालँडमध्ये काय घडलं ?

विधानसभा निवडणुकीत एनडीपीपी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, तर दुसरा क्रमांकाचा भाजपा पक्ष ठरला. या दोघांची आघाडी असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला त्याठिकाणी ७ जागा जिंकण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी- भाजपा आघाडीला पाठिंबा देण्यात आला. यावर निवडणुकांअगोदरच आमचा नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांना पाठिंबा होता. यामुळे आम्ही भाजपाशी युती केली नाही, असं शरद पवार म्हणाले.

यासंदर्भात आता संजय राऊतांनी आपली भूमिका मांडली. भाजपाने सत्ता स्थापन केली नाही. तिथल्या प्रादेशिक पक्षाचे नेते रिओ, जे आमच्यासोबत संसदेत काही काळ खासदारही होते, त्यांच्या पक्षाला २५ ते २६ जागा मिळाले आहेत. त्यांचा मुख्य पक्ष आहे. नागालँड हे सीमेवरचं राज्य आहे. संवेदनशील आहे. ते काश्मीरपेक्षा देखील खूप संवेदनशील राज्य आहे. तिथेही दहशतवाद, इतर कारवाया या गोष्टींचा धोका असतो.

Live Blog | नदीजोड प्रकल्प, शेतीसाठी मोठ्या घोषणा, अर्थसंकल्पातील संपूर्ण घोषणा वाचा एका क्लिकवर

रिओ यांच्या पक्षासोबत भाजपाची युती होती. भाजपाला १० ते १२ जागा मिळाले आहेत. इतर अनेक लहान पक्ष आहेत. या सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार बनवल, असं संजय राऊत म्हणाले. नागालँडमध्ये असा प्रयोग पहिल्यांदा झाला असे नाही. याअगोदर देखील नागालँडमध्ये अशा प्रकारचं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग झाला आहे. कारण ती या राज्याची गरज आहे. ज्याप्रकारच्या घडामोडी या राज्यामध्ये आणि सीमेवर घडत असतात. यामुळे तिथे राजकीय संघर्ष असू नये, विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं टाकता यावी, याकरिता अशा प्रकारचे निर्णय नागालँडच्या विषयी घेतले जात आहेत.

हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस थोडा कमी पडतोय, असंही संजय राऊत म्हणाले. तसेच नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती अनेकवेळा काश्मीरपेक्षा अत्यंत गंभीर आहे. तेथील मुख्य पक्षाचं सरकार आहे, सरकार हे भाजप पक्षाचे नाही. भाजपा त्यांच्याबरोबर सरकारमध्ये इतर पक्षांसोबत सामील झाला. पण हरकत नाही, आज महाविकास आघाडीची यासंदर्भात चर्चा करणार आहे. त्यावेळी हा विषय चर्चेत येणार, असंही संजय राऊत यांनी सांगितल.

Tags

follow us