Download App

Pradip Jaiswal : छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी प्रदीप जैस्वालांनी दंड थोपटले; म्हणाले, ‘आम्हीच..,’

Pradip Jaiswal : आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलेलं असतानाच आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेसाठी आधीच्या जागा सोडणार का? असा पेच समोर आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल(Pradip Jaiswal) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा ठोकला आहे.छत्रपती संभाजीनगरची जागा आम्हीच लढवणार असल्याचं आमदार प्रदीप जैस्वाल(Pradip Jaiswal 🙂 यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Rohit Pawar : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचा शिंदेंना खोचक टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)) यांनी लोकसभेसाठी लवकरात लवकर उमेदवार ठरवावा, कारण उमेदवाराला मतदारसंघात फिरुन तयारी करण्यासाठी तेवढा वेळ मिळेल, अशी मागणीच आमदार जैस्वाल यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पतीचं निधन झालं, सासूनं घराबाहेर काढलं; पहिल्याच निवडणुकीत थेट पंतप्रधानांना आव्हान… मनेका गांधी कशा बनल्या सर्वात वरिष्ठ खासदार?

तसेच ज्या जागा आधीपासून शिवसेनेकडे होत्या, जिथे आमचे खासदार आहेत, त्या जागा आम्हीच लढवणार यात शंका नाही. या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जाहीरही करतील. मी यापूर्वी खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेलो आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर मी पुन्हा लोकसभा लढवायला तयार ​​​​​​​असल्याचंही ते म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयानं दट्ट्या लावल्यानंतरच सुनावणीला वेग; अनिल परब यांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकी काही दिवसांतच येणार असल्याने सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार हालचाल सुरु झाल्या आहेत. त्यातच आता सत्तासंघर्षानंतर शिवसेनेचा शिंदे गट भाजपसोबत युती करुन निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

आता शिवसेनेचे आधीचे खासदार असलेल्या मतदारसंघात भाजपनेही चाचपणी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे शिवसेनेच्या आधीच्या जागा भाजप शिवेसेनेकडेच ठेवणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. एकंदरीत जागेच्या कोड्याबाबत खासदारांनी कोणतंही वक्तव्य करु नयेत, असे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता आगामी काळात जर शिवसेना-भाजप युती झाली तर शिवसेनेसाठी आधीच्या जागा भाजप सोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us