पवार 101 टक्के PM झाले असते; 1996 मध्ये घडलेला घटनाक्रम पटेलांनी शब्दशः सांगितला

Praful Patel On Sharad Pawar Pm Post : शरद पवार 1996 मध्ये 101 टक्के देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. पवारांना पाठिंबा देण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधकांसह शंभरहून अधिक खासदार एकत्र आले होते. शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधानपदाचं नेतृत्त्व स्वीकारावं असा सूर उपस्थितांचा होता. मात्र, ऐनवेळी पवारांनी नकार दिला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनीही शरद पवारांनीच […]

Letsupp Image   2023 12 23T141933.445

Letsupp Image 2023 12 23T141933.445

Praful Patel On Sharad Pawar Pm Post : शरद पवार 1996 मध्ये 101 टक्के देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. पवारांना पाठिंबा देण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधकांसह शंभरहून अधिक खासदार एकत्र आले होते. शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधानपदाचं नेतृत्त्व स्वीकारावं असा सूर उपस्थितांचा होता. मात्र, ऐनवेळी पवारांनी नकार दिला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनीही शरद पवारांनीच नेतृत्त्व करावं, अशी साद माझ्याकडे घातली होती. त्यासाठी ते माझ्याकडे राजीनामा देण्यासही तयार होते असा किस्सा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

‘त्या’ पेपरवर एक नंबरला आव्हाडांची सही, यालाच सगळं कळतं का? एकेरीवर येत मुश्रीफांनी फटकारलं

देवेगौडा यांनाही वाटत होतं पवारांनी नेतृत्व स्वीकारावं

देशाचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनीही शरद पवारांनीच नेतृत्त्व करावं, अशी साद माझ्याकडे घातली होती. त्यासाठी ते माझ्याकडे राजीनामा देण्यासही तयार होते. मात्र, पवारांनी यास नकार दिल्याची आठवण पटेलांनी सांगितली आहे. एवढ्या मोठ्या पदासाठी पवारांनी नकार का दिला नेमकं कारण काय होतं याबाबत मात्र आपल्याला काही कल्पना नाही असेही पटेलांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा वेळोवेळी कानावर पडत असतात मात्र, प्रत्येकवेळी पवारांकडून या गोष्टीला खो दिला जातो. पवारांनी चालून आलेली पंतप्रधानांची संधी का डावलली असा प्रश्न कायम आपल्याला पडतो असेही पटेल म्हणाले.

Sharad Pawar पूर्वी माझे हिरो होते, पण नंतरच्या काळात… नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत

काय घडलं होतं?

मुलाखतीत बोलताना प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) अनेक गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले की, 1996 मध्ये देवेगैडा यांचं सरकार पडणार असल्याचे निश्चित झालं होतं. कारण तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसकडून काढून घेतला जाणार होता. त्यावेळी त्यावेळचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान देवेगौडा यांनी मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून घेतले होते. तसेच पवारांना पंतप्रधानपदाचं नेतृत्त्व करायला सांगा, असा निरोप देत हवं तर, तुझ्याकडे पदाचा राजीनामा देऊ का? असा प्रश्न केला होता. त्यावेळी तुम्ही देशाचे पंतप्रधान असल्याचे सांगत माझ्याकडे राजीनामा देऊ नका असे नम्रपणे सांगितल्याचा किस्सा पटेलांनी सांगितला.

Exit mobile version