Download App

‘मोदी अन् भागवतांच्या भेटीचा तपशील द्या’; आंबेडकरांचं खुलं चॅलेंज

Prakash Ambedkar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोहन भागवतांच्या (Mohan Bhagwat) वर्षभरातील भेटीचा तपशील द्या, अन्यथा भेट झाली नसल्याचं गृहित धरु, असं खुलं चॅलेंजच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिलं आहे. प्रकाश आंबेडकर आज जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विधी मंडळाच्या अधिवेशनावरही टीकेची झोड उठवली आहे.

Maratha Reservation : ‘केंद्राने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी’; संभाजीराजे छत्रपतींची दिल्लीत गर्जना

प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला प्रचंड मोठा धोका आहेत. त्यांनी आरएसएसचे तीनतेरा वाजवले आहेत. पंतप्रधान मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मागील वर्षभरात कुठे आणि कितीवेळा भेट झाली. या भेटीचं तपशील द्या, अन्यथा तुमची भेट झाली नसल्याचं आम्ही गृहित धरु, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाचं माझ्याकडे सोल्युशन पण..,
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार, नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल. आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Maratha Reservation : शिंदे समितीचा अहवाल सादर; प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र मिळणार

हिवाळी अधिवेशनात लोकशाहीचा तमाशा…
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे पण ते अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही. त्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. जे विरोधकांनी मांडायला पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत. त्यामुळे हा लोकशाहीचा तमाशा आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जे ज्वलंत प्रश्न आहेत यावर सभागृहात कोणतीही चर्चा होत नाही. ज्या प्रश्नांचे महत्त्व नाही अशाच प्रश्नांची चर्चा होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात कुठही दिसत नाहीत. किंवा दिल्लीत ज्या युवकांनी संसदेत उडी घेतली. त्या बेरोजगारीचा प्रश्नही दिसत नाही. फक्त पाट्या टाकायचे कामकाज सुरु आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशातून ईव्हीएम मशीनसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी केलेल्या आहे. मात्र निवडणूक आयोग त्या तक्रारी बघत नाही, पाहत नाही. त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नेमक मी सिद्ध केल्याशिवाय हा ईव्हीएम घोटाळा आहे असं म्हणणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

follow us