Maratha Reservation : ‘केंद्राने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी’; संभाजीराजे छत्रपतींची दिल्लीत गर्जना
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी असल्याचा इशाराच स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chatrapati) थेट दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी आज दिल्लीत राज्यातील सर्व खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असल्याचंही संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे.
Maratha Reservation : शिंदे समितीचा अहवाल सादर; प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र मिळणार
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, पंतप्रधान, केंद्र सरकारने या विषयात लक्ष घालणं गरजेचं आहे. ठरावाप्रमाणे केंद्राने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी आहे. आम्ही दिल्लीत मुक्काम करु. हजारो लोक दिल्लीत येतील, या शब्दंत कडक इशाराच संभाजीराजेंनी दिला आहे.
‘शरद पवारांमुळेच आरक्षण नाही”हेडलाईनसाठी पवारच लागतात’; सुळेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर
पहिला ठराव :
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीचे अधिकार राज्यांना आहेत मात्र त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागते. ती सिद्ध करण्याठीचे निकष 1992 प्रमाणे आहेत. या निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यक आहे. आरक्षण मिळण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करणं गरजेचं आहे. 1992 च्या निकषाप्रमाणे आजची परिस्थिती नाही. त्यामुळे आता 1992 मधील निकषांमध्ये बदल करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. हा मुद्दा लोकसभेत मांडणार खासदारांनी कबूल केलं आहे.
राणे, भुसे अडचणीत येणार? काँग्रेस आमदाराच्या दाव्याने सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट
दुसरा ठराव :
सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचं नोकऱ्यांच प्रमाण बघितलं गेलं. यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी अधिक प्रमाणात दिसून आल्याने आरक्षण टिकलं नाही. मुळात हे प्रमाण तपासत असताना 100 टक्क्यांच्या अनुषंगाने तपासलं पाहिजे होतं. केवळ खुल्या वर्गाचा निकष ठेवून तपासलं गेल्याने टक्केवारी जास्त दिसून आली. टक्केवारी मोजण्याची पद्धत चुकीची असल्याचं संभाजीराजेंनी यांनी म्हटलं आहे. आता सरकारच्यावतीने क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून न्यायालयात हा मुद्दा मांडावा, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
‘शरद पवारांमुळेच आरक्षण नाही”हेडलाईनसाठी पवारच लागतात’; सुळेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर
अनेक खासदारांची दांडी :
मराठा आरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला राज्यातील अनेक खासदारांनी दांडी मारली आहे. अऩेकांनी तर यासंदर्भात माहिती मिळाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. केवळ मेल आला, फोन आला नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या. त्यावर संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे. आपण इथं राजकारण करायला आलेलो नसल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.