‘मेळाव्यातलं भुजबळांचं भाषण खालच्या पातळीचं’; संभाजीराजेंची सडकून टीका…
Sambhajiraje Chatrapati On Chagan Bhujbal : ओबीसी मेळाव्यातलं छगन भुजबळांचं भाषण खालच्या पातळीचं, मराठा ओबीसी समाजाला आवडलं नसल्याची खरमरीत टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chatrapati) यांनी केली आहे. मुंबईत आज ओबीसी नेत्यांसोबत संभाजीराजेंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
संभाजीराजे म्हणाले, राज्यात ओबीसी आणि मराठा समाज भाऊबंद आहेत, आम्ही नेहमीच सोबत आहोत आणि पुढेही राहणार आहोत, अंबडला छगन भुजबळांचं जे भाषण झालं ते खालच्या स्तराचं होतं, मराठा ओबीसीसह राज्यातील जनतेला आवडलेलं नसल्याचं संभाजीराजे म्हणाले आहेत.
Butterfly Movie: ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा विशेष शो
तसेच छगन भुजबळ यांच्या भाषणाचं कोणी कौतुकही केलं नाही. मी दोन वर्षांपूर्वी नाशिकला भुजबळांच्या घरी गेलो तेव्हा भुजबळ शाहुंच्या विचारांचे वारसदार असल्याचं म्हटलं होतं. हे वाक्य मी का वापरलं माहित नाही पण आज चुकल्यासारखं वाटतयं. आमचा ओबीसींचा काहीही वाद नाही. आजच्या बैठकीला बारा बलुतेदार आमच्या सोबत असल्याचंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.
World Cup 1987 : एक्स्ट्रा पास नाकारले अन् मराठी माणसाने वर्ल्डकपची स्पर्धाच भारतात आणली!
सध्या राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवरुन माझी तब्येत खालावली नसून मी लवकरच महाराष्ट्रभर दौरे सुरु करणार आहे. मी माझं वजन व्यायाम करुन जवळपास 13 किलो कमी केलं आहे. महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांना आदर्श देणारं राज्य आहे, सर्वसामान्य जनेतेने शिवराय, फुले, शाहु, आंबेडकरांचा संतांचा विचार समजून घ्यायला हवा. अस्थापित लोकं जे भडकावण्याचा प्रयत्न करताहेत अंबडमध्ये त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क रहायला हवं, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात सामाजिक संतुलन बिघडू नये, म्हणून ओबीसी मराठा आज एकत्र बैठक घेत आहेत. राज्यातील कुणबी, माळी, धनगर, सुतार, बंजारा, सर्वच समाजाचे नेते उपस्थित आज उपस्थित आहेत. बीडच्या घटनेवरुन जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांना आमचा पाठिंबा नसून हे षडयंत्र आहे, सरकारने याचा शोध घ्यायला हवा, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आणि मराठा समाजबांधवांच्या सभा सुरु आहेत. एकीकडे मनोज जरांगे सभा घेताहेत तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबडमध्ये सभा घेतली. या सभेतून छगन भुजबळांनी मराठा समाजासह मनोज जरांगेंवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. भुजबळांच्या या टीकेवरुन राज्यात मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी दिलं होतं.
एकंदरीत या संपूर्ण टीकेच्या सत्रावरुन आज संभाजीराजे आणि ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांसह ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांसह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.