Download App

महाविकास आघाडीशी घटस्फोट घ्या, दोघे मिळून 24-24 जागा लढवू : आंबेडकरांचा ठाकरेंना प्रस्ताव

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार की नाही याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मागील अनेक दिवसांपासून केली आहे. त्यांनी चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवण्याचे सूत्रही दिले आहे. मात्र अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत (MVA) प्रवेश होऊ शकलेला नाही. अखेरीस असा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभेच्या 24-24 जागा वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत लेखी कळविले असल्याची माहिती आहे.

यातून आंबडेकर यांनी एक प्रकारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाविकास आघाडीशी काडीमोड घ्यावा, असेही सुचविले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव स्वीकारावा, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे. काँग्रेसला गमावलेले जनमत परत मिळवता आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दुभंगली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाने दुय्यम भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी सुचविले आहे.

चालकांचा संप पण पेट्रोल पंप खुलेच राहणार ! टँकरला पोलीस संरक्षण

शिवसेनेने पक्ष एकत्रित असताना गेल्या निवडणुकीत भाजपसोबत युतीत 22 जागा लढवल्या होत्या. पण आता महाविकास आघाडीत किती जागा वाट्याला येतील याचा विचार करावा. त्यापेक्षा इथे दोन अधिकचे मतदारसंघ लढायला मिळतील. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार असेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्रित लढावे. अशी ठाम आणि लेखी भूमिका आंबेडकर यांनी ठाकरेंसमोर स्पष्ट केली आहे. आता यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Manipur Violence : नव्या वर्षात मणिपूर पेटलं! गोळीबारात चौघांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत कर्फ्यू

आता तरी आम्हाला इंडिया आघाडीचे दारे बंद :

प्रकाश आंबेडकर हे भीमा-कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यसााठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. इंडिया आघाडीतमध्ये आमचा समावेश कधी होणार, हे त्यांनीच ठरवायचं आहे. तेच तुम्हाला आमचा सहभाग कधी होणार हे सांगतील. आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारं बंद आहेत, असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी थेत 24-24 जागा लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

follow us