चालकांचा संप पण पेट्रोल पंप खुलेच राहणार ! टँकरला पोलीस संरक्षण
पुणे: मोटार वाहन नियमात (New Motor Vehicle Act) बदल करण्यात आल्याने ट्रक चालक हे संपावर गेले आहेत. त्यात पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांचा समावेश आहे. पेट्रोलपंप बंद राहू शकतात. त्यामुळे आज वाहनचालकांची मोठी धावपळ उडाली. राज्यातील अनेक भागातील पेट्रोल पंपावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. पेट्रोल पंप बंद राहिल्यास आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे सरकारकडून याची दखल घेण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या टँकर हे पोलिस संरक्षणात पेट्रोलपंपावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुडवडा निर्माण होणार नाही. तसेच पेट्रोल पंपही उघडे राहणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; नवीन 70 रुग्ण आढळले
याबाबत माहिती देण्याचे पत्र ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (AIPDA) प्रवक्ता अली दारुवाला यांनी जाहीर केली आहे. संपूर्ण भारतातील वाहतूकदारांच्या संपाचा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासनाने लोणी डेपो येथून पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकरना पोलिस संरक्षण दिले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचे दारुवाला यांनी सांगितले आहे. पेट्रोल पंप बंद राहतील, या भितीने राज्यातील सर्वच भागात पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे, नगर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आव्हाडांनी पुण्यात येऊन अजितदादांना शिंगावर घेतले; आतापर्यंत त्यांची केवळ दादागिरीच !
नवी मुंबईत आंदोलकाला हिंसक वळण
मोटार वाहन नियमात बदल करण्यात आल्याने संतप्त ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनादरम्यान, पोलिस-आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
नवीन मोटार वाहन कायदा काय?
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन मोटार वाहन कायदानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत. ट्रकचालकांचा आजपासून तीन दिवसांचा संप आहे.