Prakash Ambedkar Health : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वंचितने अधिकृत पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. आज सकाळी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, कार्यकर्ते रुग्णालयाजवळ गर्दी करत असल्याने सुजात आंबेडकरांनी कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे येऊ नये, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा (Sujat Ambedkar) असं आवाहन केलं.
ऐन दिवाळीत शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांना धक्का, सेन्सेक्स 553 अंकांनी घसरला
प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकर यांना रुग्णालयात अचानकपणे दाखल करण्यात आल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी रुग्णालयाबाहेरून माध्यमांशी संवाद साधताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व वैद्यकीय उपचार सुरू असल्याचं सांगितलं. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे येऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
मेडिकल बुलेटिन
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा
सुजात आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन pic.twitter.com/Knrm8551Kn— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 31, 2024
दादांनी ‘माघार घ्या’ म्हटलं, तर त्यावेळेसचं पाहूनच निर्णय घेईल; नाना काटेंनी स्पष्टच सांगितलं
सुजात आंबेडकर म्हणाले की, काल रात्री छातीत दुखल्यामुळे प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे, डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत आहेत. सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे येऊ नये, कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन सुजात यांनी केलं.
माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका. आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत आहोत, असंही सुजात यांनी म्हटलं.
ते म्हणाले, आम्ही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलो आहोत. जसा रिपोर्ट येईल तशी माहिती बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या हॅण्डलवरून कळवण्यात येईल. त्यांच्या तब्येतीच्या सगळ्या अपडेट्स दिल्या जातील, असं सुजात म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचं वंचितच्या ट्विटर हॅण्डलवरून कळवण्यात आलं.
निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावल्याने पक्षाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. आंबेडकर लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी पक्षाचे कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.