मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; छातीत दुखत असल्यामुळे रूग्णालयात दाखल
Prakash Ambedkar admitted to hospital : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्याने डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षाकडून यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेली आहे.
प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे 31 ऑक्टोबर रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार (Prakash Ambedkar admitted to hospital) सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षांची प्रकृती खालावल्याचं समोर आलंय.
‘फसक्लास दाभाडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
आंबेडकर कुटुंब यावेळी कुणाच्याही प्रश्नांना सामोरं जाणार नाही. आपणास विनंती आहे, की कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करण्यात यावा, कारण सध्या ते कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत, असे आवाहन वंचित कडून करण्यात आलंय. पुढील 3-5 दिवस प्रकाश आंबेडकर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस VBA च्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. बाळासाहेबांना तुमच्या चिंतनात ठेवा आणि ते लवकर बरे व्हावे ही प्रार्थना, असं आवाहन वंचितकडून करण्यात आलंय.
‘दलित-मराठा-मुस्लिम समीकरण जुळलं तर…’, मनोज जरांगेंचा इशारा, आज धर्मगुरूंसोबत बैठक
प्रकाश आंबेडकर यांना पूर्वी देखील हृदयविकाराचा त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांनी राजकारणातून ब्रेक घेतलेला होता. प्रकाश आंबेडकर यांना बाळासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाते. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी स्वबळावर मैदानात उतरलेली आहे. बाळासाहेब यांच्या प्रकृतीमुळे पक्षाला ऐन निवडणुकीच्या धामधुमीत धक्का बसला आहे. परंतु सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.