Prakash Ambedkar on Baramati Loksabha : महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वेगळी वाट निवडली. त्यांनी स्वतंत्रपणे वंचितचे उमेदवार लोकसभेसाठी उभे केले. अनेक मतदारसंघात त्यांनी उमेदवार दिले. मात्र, त्यांनी बारामतीत वंचितचा उमेदवार दिला नाही. बारामतीत उमेदवार न देण्याचं गुपित आता आंबेडकरांनी सांगून टाकलं.
T20 विश्वचषकासाठी किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी
प्रकाश आंबेडकरांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावरही भाष्य केलं. ते म्हणाले, शरद पवार हे बारामतीत अडकले आहेत. त्यांच्याविषयी मी आता बोलणार नाही. पण, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची संधी, असिस्टंट कमांडंट पदाच्या 506 जागांसाठी भरती सुरू
यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली. मोदी सरकारच्या काळात 17 लाख कुटुंबानी भारत सोडला आहे. ते विदेशात जाऊन बसले आहे, हे मी सांगत नाही. तर शासनाची ही आकडेवारी आहे. नागरिकत्व सोडलेले सगळे हिंदू आहेत. या सर्व कुटुंबानावर इलेक्ट्रॉल बॉण्डची सक्ती केली होती का? असा संशय आहे, असंही आंबडेकर म्हणाले.
मोदींनी चारशे पारचा नारा दिला. त्यांना संविधान बदलायचं त्यामुळं त्यांना चारशे जागा पाहिजेच. टीका होऊ लागल्यावर मोदीजी सांगतात की, बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही. पण, हा त्यांचा दिखावा आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली.
देशात मतदानाचा टप्पा घसरला आहे. जे मतदान झालं नाही, ते भाजपचं आहे. त्याचा मोठा फटका या निवडणुकीतत भाजपला बसेल, असंही आंबेडकर म्हणाले.
2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशावरील कर्ज वाढले आहे. निर्मला सीताराम यांचे पती म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपेल, निवडणुका होणार नाहीत, संविधान संपेल, गल्लाोगल्ली तुम्हाला मणिपूर दिसेल. पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या गोष्टी समोर आणायला अपयशी ठरले, असं आंबेडकर म्हणाले.
पुण्यातला उमेदवार 15 ते 20 हजारांनी निवडून येईल
वसंत मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून त्यांना डावलल्या गेलं. ज्याला वगळलं जात होतं, आम्ही त्याच्या बाजूने उभं राहिलो.आता पुण्यात भाज आणि वंचितची लढत आहे. इथं कोणीही नक्की सांगू शकत नाही की, कोण विजयी होईल? मात्र, विजयी होणारा उमेदवार 15 ते 20 हजारांनी निवडून येईल, असं आंबेडकर म्हणाले.