Prakash Ambedkar on Ganpat Gaikwad Firing : काल (दि,. 2 फेब्रुवारी) भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad)हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सहा गोळ्या काढल्या आहेत. या गोळीबारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. तुम्ही राजे नाहीत, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं.
इम्रान खानच्या पत्नीला 7 वर्षांची शिक्षा, लग्नाला ठरवले ‘गैर-इस्लामिक’
उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. प्रकाश आंबेडकरांनी एक्सवर पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणतात, राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे घसरला आहे. तुमचे कितीही मतभेद असले तरी लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाहीत. तुम्हाला लोकं राजे बनवतात. तेव्हा मर्यादेत राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे. अशा मानसिकतेच्या लोकांना जनतेनं घरी बसवलं पाहिजे, तेव्हाच लोकशाही टिकेल, असं आंबेडकर म्हणाले.
राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे घसरला आहे. तुमचे कितीही मतभेद असले, तरी लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाहीत. तुम्हाला लोकं राजे बनवतात. तेव्हा मर्यादेत राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. अशा मानसिकतेच्या लोकांना जनतेने घरी बसवले पाहिजे, तेव्हाच लोकशाही…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 3, 2024
पुढं त्यांनी लिहिलं की, राज्यातील पूर्ण प्रसासन कोसळले आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याकडे बघितलं पाहिजे. राज्यात असाच गुंडाराज होत असले तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारपोलीस ठाण्यातच गोळीबार करत आहे. यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलिसांवर प्रचंड दबाव असून त्यांना कायद्यानुसार काम करू दिले जात नाही, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला.
दरम्यान, आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ही गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला.