Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीशी युती केली तर वाचाल नाही तर जेलमध्ये जाणार असल्याचा रोखठोक इशाराच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना दिला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये वंचितची सभा पार पडली. या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांना अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे.
Ayodhya Ram Mandir : श्रीराम चरणी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य…
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्याबाबत मला शंका येत आहे. यांना खरंच मोदींना आणि भाजपला हरवायचं आहे काय? विशेष म्हणजे म्हणजे ते म्हणताहेत की वंचित बहुजन आघाडीला दोन जागा देत आहोत. त्यावर आम्ही म्हटलं कुठल्या दोन जागा? तर आमच्याच अद्याप वाटाघाटी झाली नाही तर तुम्हाला कुठून देणार? असं सांगण्यात आलं असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
1992 चे वर्ष, रेल्वे स्टेशन अन् कारसेवकांची गर्दी : फडणवीस यांचा अयोध्या आंदोलनातील फोटो सापडला
तसेच दोन वर्षांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 48 वाटून घेता येत नाहीये. इंडिया आघाडीला युती करायची नाही म्हणून कोणीतरी बकरा पाहिजे आहे . आम्ही बकरा नाही. पहिल्यांदा तुमच्या जागा तुम्ही वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजेत, त्या जागा ज्याच्याकडे गेल्यात त्याच्याशी बोलून आम्ही वाटाघाटी करु. नाही करणार असाल तर आम्ही 48 जागा लढवणारचं आहोत, पण बेट्यांनो एक लक्षात घ्या, वंचित आघाडीचा एकही जेलमध्ये जाणार नाही, जेलमध्ये सोनिया गांधीपासून इतर जण जेलमध्ये जाणार असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
एक किंवा दोन अपत्यांबाबत अजितदादा आग्रही; घरांचं कारण पुढे करत सांगितलं वास्तव
मोदी वाघ म्हणलं तरी खातोयं वाघोबा म्हणलं तरीही खातोयं मग दोन हात करायला भीतायं का? तुम्हाला खरंच लढण्याची इच्छा आहे काय? काँग्रेसवाल्यांनो तुम्हाला हरण्याची भीती आहे का? तुमच्यावर कारवाईची भीती आहे एकत्र आलात तर ती भीतीची तलवार तुम्ही उडवू शकता, पण भिऊन लढला तर ती तलवार तुमच्या मानेवर पडणार, वंचितशी युती केली तर वाचाल नाहीतर जेलमध्ये जाणार असल्याचा इशाराच आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.