Prakash Ambedkar : देशभरात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अलीकडेच वंचित बुहजन आघाडीचाही मविआत समावेश झाला. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने त्यांनी कॉंग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. काँग्रेसमधील काही लोक हे सुपारीबाज म्हणून काम करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला. या सुपारीबाजांची नावही येत्या तीन-चार दिवसांत आपण जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
‘आर्टिकल 370’चं दुसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण! बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई
मविआसोबत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे इच्छुक आहेत. मात्र जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने ते चांगलेच आक्रमक झालेत. आज एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये सुपारीबाज कोण कोण आहेत त्यांची नावे तीन-चार दिवसांनी जाहीर करणार आहे. त्यांची नावंही घ्यायला आम्ही घाबरत नाहीत, असं आंबेडकर म्हणाले. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी या नेत्यांना पक्षातून काढावं, असं आंबेडकर म्हणाले.
ठाकरे गटातील दुफळी चव्हाट्यावर… वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया देतांना सांगितलं की, अद्यापही महाविकास आघाडीचा जागेचा तिढा सुटला नाहीय. अजून 15 जागांवर मतभेद आहेत. आज आमची बैठक होती. मात्र, ती बैठक रद्द झाली. मात्र, आजची बैठक रद्द झाली हे कळवण्याची कुणी तसदीच घेतली नाही. त्यामुळे त्यामुळं महाविकास आघाडीत आमची जागा काय आहे हे आम्हाला कळलेलं आहे. जेव्हा ते बोलवतील तेव्हा आम्ही जाऊ आणि आमची भूमिका त्यानंतर मांडू, असं आंबेडकर म्हणाले.
जरांगेंमुळे मतांचं ध्रुवीकरण
राज्यात भाजपच्या जागा निवडून न येण्यासाठी मतांचं ध्रुवीकरण गरजेचं आहे. हाच धागा पकडून आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या आणखी १५ जागांवरील वादातील तिढा सुटलेला नाही. आधीच मतांचं ध्रूवीकरण झालंय.त्यामुळं यांच्याकडून काही वेगळं ध्रुवीकरण होणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मतं विभागली जाणार आहेत. याचे निवडणुकीत पडसाद उमटणार आहेत, असा दावा आंबेडकरांनी केला.
दरहम्यान, आम्हाला महाविकास आघाडीत यायला आम्ही इच्छुक असल्याचं आंबेडकर सांगतात. आणि दुसरीकडे मविआतील घटक पक्षांवरच टीका करतात. त्यामुळे महाविकास आघाडीत वंचितला खरोबर स्थान मिळेल का? हेच पाहणं महत्वाचं आहे.